ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानखुर्द:- महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या भुयारी मार्गातील रस्त्याच्या कामाला सुरुवात- RPS स्टार न्यूजच्या बातमीला यश.

प्रतिनिधी संदीप जाधव मानखुर्द:-9869155925

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

मुंबई:-23/08/2022.

मानखुर्द:- महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या भुयारी मार्गातील रस्त्याच्या कामाला सुरुवात- RPS स्टार न्यूजच्या बातमीला यश. महाराष्ट्रनगर आणि समतानगरला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली पाहावयास मिळत आहे. मेन हायवे पासून भुयारी मार्गाने पुढे समतानगर पर्यंत पूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर बऱ्याच वेळेला वाहन चालकांचा अपघात झालेला आहे. रस्त्याला पल रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालक व इतर वाहन चालकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हा सगळा प्रकार RPS स्टार न्युजच्या लक्षात आल्यावर स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन त्याचा व्हिडिओ बनवून यूट्यूब चैनल आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. भुयारी मार्गातच खड्डे पडलेले नसून पुढील समता नगर पर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. तयार रस्त्याचे पूर्ण खड्डे बुजवण्याचे काम लवकरच करावे. याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे आणि वाहन चालकांच्या निरीक्षेचालकांची होणारी तारांबळ तसेच पादचारी जाणाऱ्या लोकांना होणारा त्रास टाळावा यासाठी तातडीने रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे न्यावे अशी आशा RPS स्टार न्युजच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. भुयारी मार्गातील रस्त्याचे खड्डे आणि रस्त्याचे काम चालू झाल्याचे पाहून लोकांनाही आनंद होत आहे. याच पद्धतीने पुढील महाराष्ट्र नगर ते समता नगर पर्यंत झालेल्या रस्त्याची दुरावस्था रस्त्यातील खड्डे बुजून पूर्ण करावे अशी स्थानिक लोकांची मागणी आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button