आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-चितळी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-चितळी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.

जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण; शिक्षक, पालक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती.

मायणी प्रतिनिधी | चितळी
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार जिल्हा परिषद शाळा, चितळी येथे विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या गणवेशाचे वाटप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी डॉ. संभाजी कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध करून देण्यामागील शासनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करून शाळेचे, गावाचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास अविनाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पवार, देवानंद पवार, दीपक पवार, बंडा पवार, सुरज पवार, मनोहर महाजन, निलेश पवार यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button