श्रीरामपूर:-हरेगावमध्ये खा.सुजय विखे यांच्या शुभहस्ते ६०१ घरकुल योजनेचा शुभारंभ – बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वितरण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हरेगावमध्ये खा.सुजय विखे यांच्या शुभहस्ते ६०१ घरकुल योजनेचा शुभारंभ – बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वितरण.

हरेगावमध्ये खा . सुजय विखे यांच्या शुभहस्ते ६०१ घरकुल योजनेचा शुभारंभ.
बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तातुक्यातील हरेगाव ग्रामपंचायतीस मंजुर झालेल्या ६०१ घरकुल योजनेचा शुभारंभ व भूमिपुजन सोहळा खा . सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते शेती महामंडळ कार्यालय पाठीमागील हरेगाव – ब्राह्मणगाव रोड येथे संपन्न झाला यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तुंचे वाटप देखील करण्यात आले .या प्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना खा सुजय विखे म्हणाले ” हरेगावसह श्रीरामपुर तालुक्यातील नागरिकांना गेली अनेक वर्षे विविध प्रश्रांसाठी संघर्ष करावा लागत होता घरकुल योजना पुतळे . विकासकामे अशा प्रत्येक मागणीसाठी आंदोलन करावे लागले अनेक वर्ष संधी मिळूनही स्थानिक नेतृत्वाने हे प्रश्र मार्गी लावले नाहीत . त्यामुळेच जनतेच्या विश्वासाने आम्ही पुढाकार घेत आहेत ते पुढे म्हणाले ” आजपर्यंत तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना घरकुलांसाठी जमीन देण्यात आली आहे . शिर्डी येथे नुकतेच २०० कोटी रुपयांची जमीन 3०० लाभार्थीना वाटप केल्यानंतर हरेगावला आलो . पुढील चार वर्षात श्रीरामपुर तालुक्यातील एकही विकासप्रश्र प्रलंबिद राहु देणार नाही.
खा विखे यांनी पुढे सांगितले ” ४० वर्षे प्रलंबित असलेला छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्र फक्त सहा महिन्यान मार्गो लावला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकरिता दीड कोटी रुपयांची तरतूद करून तो प्रश्रही निकाली काढला आहे ” तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने महायुतीसोबत राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माजी सरपंच दिलीप त्रिभूवन यांनी केले भाऊसाहेब बांद्रे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीन भूमिका रमेश भालेराव यांनी पार पडला.यावेळी माजी सभापती दीपक पठारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अनिल भनगडे, दिलीप त्रिभूवन, रमेश भालेराव,भाऊसाहेब बांद्रे,डॉ शंकरराव मुळे गिरीधर आसने,शरद नवले, बाबासाहेब चिडे,गणेशराव मुदगुले, नानासाहेब शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.




