पुसेसावळीत दहावीची बोर्ड परीक्षा उत्साहात सुरू.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

पुसेसावळीत दहावीची बोर्ड परीक्षा उत्साहात सुरू.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील
पुसेसावळी (ता.खटाव ):- पुसेसावळी येथे कालपासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू झाली. येथील महात्मा गांधी विद्यालय, पुसेसावळी या परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. आसनव्यवस्था, देखरेख व शिस्तबद्ध नियोजनामुळे परीक्षा सुरळीत पार पडली. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तणावमुक्त वातावरण निर्माण केले.
केंद्राबाहेर पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. आपल्या पाल्यांच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी पहिला पेपर अपेक्षेप्रमाणे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाची पायरी मानली जात असून, पुसेसावळी परिसरात या परीक्षेकडे विशेष लक्ष लागले आहे.




