मसूर:-कालगाव येथे बिबट्याचे वारंवार दर्शन; भीतीचे वातावरण वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

कालगाव येथे बिबट्याचे वारंवार दर्शन; भीतीचे वातावरण वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी.

कराड प्रतिनिधी सुशील कुमार पुजारी
कालगाव तालुका कराड: परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वस्तीच्या आसपास उसाच्या पिकाजवळ बिबट्या दिसल्याचे घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः सायंकाळच्या व पहाटेच्या वेळी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मते, संबंधित वन विभागाने ठोस कारवाई करावी. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरा लावणे, कॅमेरा ट्रॅप बसवणे, तसेच नियमित ग्रस्त वाढवणे आवश्यक असल्याची मागणी ही ग्रामस्थांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर कालगाव ग्रामपंचायत सदस्य धीरज पवार यांनी वन विभागाने याकरिता तातडीने लक्ष देऊन उपाययोजना राबवावी अन्यथा कालगाव मध्ये कुठल्याही व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झाल्यास त्यास सर्वस्वी वनविभाग जबाबदार धरले जाईल याची नोंद घ्यावी. असा इशारा त्यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे मागणी त्यांनी केले आहे. दरम्यान नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे लहान मुलांना व पशुधनाला एकटे सोडू नये तसेच बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.




