कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यात युवतीच्या उपोषणाने महिला सबलीकरणाचे निघतात धिंडवडे. 

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यात युवतीच्या उपोषणाने महिला सबलीकरणाचे निघतात धिंडवडे.

सातारा दि: सातारा येथील विद्या रखमाजी शिंदे या युवतीने जून महिन्यात उपोषण केले होते .तिच्या प्रश्नाबाबत चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. पण, त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे सदर युवती पुन्हा आंदोलनासाठी उपोषणाला बसली आहे. त्यामुळे महिला सबलीकरणाचे धिडवडे निघत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन एका बिल्डरच्या विरोधात न्याय मिळावा. यासाठी युवतीने वारंवार तक्रारी करून चौकशीची मागणी केली होती. सदर समर्थ बिल्डर्स व शासकीय अधिकारी यांचे साठे लोटे असल्यामुळे त्या युवतीला न्याय मिळाला नाही. तसेच दोन वेळा उपोषण करूनही त्याची गंभीर दखल घेतली नाही. ही बाब निषेधार्थ असून सातारा नगरपालिकेतील मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांच्या गैर कारभाराची चौकशी करावी. असे नमूद केले आहे. सदर युवतीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेली अकरा वर्षे सातारा नगरपरिषद अधिकारी कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण झालेले आहे. याबाबत बोट चेपीचे धोरण होत असल्याने आंदोलन शिवाय पर्याय राहिला नाही. सदर आंदोलन करणारी विद्या शिंदे यांच्या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार मंच प्रदेशाध्यक्ष संजय घार्गे ,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवम कदम,,वंचित बहुजन आघाडी सतिश कांबळे, अमोल गंगावणे जनता क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांनी ही या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्याचे लेखी पत्र सातारा जिल्हाधिकारी व सातारा शहर पोलीस ठाण्यात दिले आहे .सदर युवती कोणत्याही आमिषाला बळी न पडता आंदोलन करत असल्याने महिला सबलीकरणाच्या बाबत साताऱ्यातील काही महिलावर्ग शंका घेत आहे.
प्रशासनाविरोधात उद्या नऊ वाजता क्रांती दिनी घोषणाबाजी करण्यात येणार आहे . या लढ्यात सहभागी होण्यासाठी शशिकांत आरगडे, सचिन ननावरे, सतीश डोंगरे, गौरव भंडारे ,बाळकृष्ण घोरपडे, अलुम कलम मुल्ला ,विशाल आव्हाड, अभिजीत कदम, प्रणव गायकवाड, संजय घाडगे यांच्यासह अडवोकेट दयानंद माने ,सुनीता शिंदे, सुवर्णा काटकर, राजश्री भोकरे तसेच चंद्रकांत मुकुटराव ढेंबरे आधी सहभागी होणार आहेत .
महिला सबलीकरणाबाबत सर्वच राजकीय पक्ष संघटना महिला दिन साजरा करतात. परंतु ,सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक युवती न्यायासाठी बसली असतानाही एकाही राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. ही निषेधार्थ बाब असून अशा महिला पदाधिकाऱ्यांबाबत समाजात योग्य निर्णय देईल .अशी प्रतिक्रिया उपोषण कर्त्या विद्या शिंदे यांनी दिली आहे.
————————————&————&&———
फोटो – उपोषणासाठी बसलेले विद्या शिंदे व मान्यवर (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button