ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मुख्यमंत्र्यांच्या दरे गावातील मागासवर्गीयांच्या जमिनीवर रेल्वेचा कब्जा , ग्रामस्थांचे आंदोलन.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

मुख्यमंत्र्यांच्या दरे गावातील मागासवर्गीयांच्या जमिनीवर रेल्वेचा कब्जा , ग्रामस्थांचे आंदोलन.

सातारा दि,: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावातील लोकांचे कोयना धरणातून पुनर्वसन झाले आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन झालेले आहे. त्या कोरेगाव तालुक्यातील भीमनगर- दरे गावातील जमिनीवर आता रेल्वेच्या कब्जा झाल्याने ३५ कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रमेश उबाळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत माहिती अशी की, कोयना धरणातून विस्थापित झालेल्या भीम नगर व दरे गावातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना पुनर्वसन म्हणून कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड नजीक झाले आहे.याठिकाणी मागासर्गीयांसाठी जमीन व वसाहत निर्माण केलेली आहे .परंतु अलीकडच्या काळामध्ये पुणे- मिरज रेल्वे लाईनचे काम सुरू झाले आणि भीम नगर येथील १३ गुंठे व दरे येथील १७ गुंठे अशी स्मशान भूमीतील ३० गुंठे जमीन रेल्वे लाईन साठी संपादित केलेले आहे.
सदर जमिनीचा कोणताही मोबदला रेल्वे खात्याकडून भीम नगर व दरे येथील गावातील मागासवर्गीय यांना मिळाला नाही. यामुळे ३० कुटुंबीयांना न्यायासाठी उपोषण करावे लागत आहे. अगोदर कोयना धरणांनी मारले आता पुन्हा रेल्वे लाईन मध्ये जमिनी गेल्यामुळे पुनर्वशीत मागासवर्गीयांची अवस्था ना गतिमान झाली. ना ट्रिपल इंजिनचा त्यांना फायदा झाला. अशा शब्दात युवा नेते रमेश उबाळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत न्याय न मिळाल्यास३५ कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचाही निर्णय भीम नगर व दरे ग्रामस्थ तसेच दरे सरपंच आनंद जाधव, भीम नगर सरपंच सुरेश कांबळे, तसेच सखाराम ससाणे, विजय लोखंडे, राजेंद्र कांबळे, नारायण लोखंडे, विनायक कांबळे, अजित लोखंडे, सचिन कांबळे ,राजाराम कांबळे, यशवंत चव्हाण, सुरेश सपकाळ यांनी दिला आहे आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब ओव्हाळ, काँग्रेस पक्षाचे ओ.बी.सी. जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ कुंभार, सातारचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे, भीमशक्तीचे राज्य रत्न कांबळे व मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. अशा शब्दात पाठिंबा दिला आहे .

छाया- भीम नगर व दरे येथील ग्रामस्थांच्या न्यायासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित ग्रामस्थ व पाठिंबा देणारे कार्यकर्ते
(छाया- निनाद जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button