आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-ज्योतिष हे आधुनिक काळातील दिशादर्शक आहे_____वल्लभानंद शंकराचार्य.

पत्रकार दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार दिलीप पुस्तके सातारा

ज्योतिष हे आधुनिक काळातील दिशादर्शक आहे_____वल्लभानंद शंकराचार्य.

मायणी प्रतिनिधी_ज्योतिष हे अति प्राचीन शास्त्रातून विज्ञानाचे विज्ञान तर भौतिकशास्त्राचे भौतिकशास्त्र असून ते कालबाह्य न झालेले खगोलशास्त्रावर आधारित विज्ञान आहे सध्या एकविसाव्या शतकात माणसाचे प्रश्न वाढले आहेत या प्रश्नाचे उत्तर या ज्योतिषशास्त्रातून मिळतात म्हणूनच हे ज्योतिषशास्त्र आधुनिक काळातील दिशादर्शक आहे असे मत वलाभानंद शंकराचार्य महाराज गाणगापूर यांनी श्री क्षेत्र नरसिंह वाडी येथे ज्योतिष अधिवेशनात बोलताना व्यक्त केली वाघजाई देवस्थान ट्रस्ट व सातारा ज्योतिष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन नरसिंह वाडी येथे भरण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून महाराज बोलत होते या कार्यक्रमास आमदार प्रकाश अण्णा आवडे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर, प्रदीप पंडित पुणे, श्रीधर कुलकर्णी इस्लामपूर विकास पुजारी अमोल, पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी दत्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजक नंदकुमार जोशी यांनी अधिवेशन भरण्याचा उद्देश्य स्पष्ट करून नामांकित ज्योतिषांची विचार एकत्र करून एक नवीन विचार देण्याचा संकल्प असल्याने हे अधिवेशन भरविले आहे यानंतर मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या भाषणात आमदार प्रकाश अण्णा आवाडे म्हणाले की ज्यांना गरज वाटते त्यांनी ज्योतिषाकडे जावे परंतु या शास्त्राची समाजाला खरंच गरज आहे असे सांगितले महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सध्या अनेक तरुण या शास्त्रामध्ये करिअर करू इच्छितात त्यांना आपण योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे यावेळी प्रदीप पंडित व श्रीधर कुलकर्णी यांनी आपली मनोगती व्यक्त केली झालेल्या चर्चा सत्रात श्रीधर कुलकर्णी यांनी प्राचीन गुणमेलन पद्धती किचकट असून त्यामुळे विवाह विलंब होतो त्यासाठी आधुनिक गुणमेलन पद्धती विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर झालेल्या चर्चासत्रात प्रिया मालवणकर__कुंडलीतील योग उपासना, नारायण सुट्टणकर हातावरच्या रेषा भाग्य बदलतात का,? डॉक्टर डीजे सावंत कृष्णमूर्ती व पारंपारिक समन्वय डॉक्टर प्रदीप जाधव जुळ्यांच्या कुंडल्या व त्यांचे भविष्य विवेक शास्त्री गोडबोले _परिहार सचिन बेहरे कराड वास्तुशास्त्र प्राचीन ग्रंथपरंपरा या विषयावर चर्चा सत्र झाली या कार्यक्रमास अनुसया मालू एन डी फडके अरुण इनामदार डीआरटी अमरनाथ स्वामी रमेश उमरीकर पद्मा कासट सपना पवार प्रसन्न मुळे रत्नागिरी,विजयानंद पाटील, मनोज जोशी, अर्चना रांजणे ,तसेच महाराष्ट्रातील अनेक ज्योतिष प्रेमी उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button