खटाव:-धनंजय जवंजाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
.धनंजय जवंजाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार.
मायणी प्रतिनिधी_निमसोड तालुका खटाव येथील रहिवाशी व निमसोड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री धनंजय प्रल्हाद जवंजाळ यांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र निमसोड, आरोग्य विभाग खटाव तालुका पंचायत समिती खटाव तालुका पंचायत समिती, मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्ती दिवशीच भव्य सत्कार समारंभ जय भवानी मंगल कार्यालय निमसोड येथे घेण्यात आला या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सयाजी पवार होते तर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजीत भैय्या देशमुख, व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी जयप्रकाश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजीत भैय्या देशमुख यांनी सांगितले की प्रामाणिकपणा हा जीवन जगण्याचा बिनधोक मार्ग आहे या मार्गाचा अवलंब धनंजय जवंजाळ यांनी आयुष्यभर केला तसेच रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून अखेरपर्यंत त्यांनी काम केले त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी आपल्या भाषणात धनंजय जंजाळ यांना निरामय आयुष्याच्या शुभेच्छा देऊन अध्यात्मिक वारसा असलेल्या या घराण्याचे त्यांनी कौतुक केले व पुढील आयुष्यास शुभेच्छा दिल्या यानंतर गणेश जाधव, छगन शिंदे, चंद्रकांत मोरे सुशील तुरक माने ,डॉक्टर अजिंक्य पुस्तके ,यांचा यांची धनंजय जवंजाळ यांच्या कार्याचे कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली सत्कारास उत्तर देताना धनंजय जवंजाळ यांनी सांगितले की मी माझे कर्तव्य पूर्ती केली आहे प्रामाणिक काम केल्याने माझ्या जीवनात मला आनंद मिळाला आहे कर्म हीच माझी पूजा होती त्यामुळे मी प्रत्येक काम आनंदाने करत होतो आता उरलेल्या आयुष्यात आर्ट ऑफ लिविंग चे काम करणार आहे या कार्यक्रमास डॉक्टर सुशील तुरक माने डॉक्टर अजिंक्य पुस्तके सुयोग काटकर छगनराव शिंदे चंद्रकांत मोरे रवींद्र बाबर पांडुरंग लोहार जयंत जवंजाळ शहाजी खाडे विशाल माळी सुहास शिंदे शामराव मोरे ऋषिकेश जवंजाळ मालोजीराव पवार शिवराम मोरे तसेच जवंजाळ यांचे नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता शेवटी ऋषिकेश जवंजाळ यांनी आभार मानले.