खटाव:- वडगाव येथील जयराम स्वामी विद्या मंदिराचा निकाल 94. ४० टक्के.
पत्रकार दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

पत्रकार दिलीप पुस्तके सातारा
जयराम स्वामी विद्या मंदिराचा निकाल 94. ४० टक्के. मायणी प्रतिनिधी__खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या वडगाव जयराम स्वामी येथील जयराम स्वामी विद्या मंदिराचा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी या माध्यमिक परीक्षेचा निकाल ९४. ४० टक्के लागला असल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य जयंत घार्गे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाने वडगाव केंद्रात व परिसरात अव्वल दर्जा कायम राखला असून श्रेया शंकर घुटुकडे हिने 94 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक पटकावला कुमारी सृष्टी शांताराम निकम हिने 93 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर प्रथमेश ज्योतीराम मगर याने 91.5 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला विनायक किरण घाडगे व शिवम उमेश नागमल यांनी 91 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला तर अथर्व सुहास शिंदे यांनी ९०.२० टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला 90% च्या वरती सात विद्यार्थी 85 ते 90 टक्के मध्ये अकरा विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून संस्थेचे अध्यक्ष विकास घार्गे उपाध्यक्ष अंकुश घार्गे सचिव बरकडे तात्या प्राचार्य जयंत घार्गे पर्यवेक्षक सुनील पुजारी माजी सचिव काशिनाथ दुटाळ प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी अभिनंदन केले