मुंबई:-शिंदे फडणवीस सरकार वाचले.
संपादक:- प्रल्हाद चव्हाण- 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
एकनाथ शिंदे सरकार
मुंबई: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हा ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय येण्यात सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. त्यामुळे कितीही चुका नंतर झालेल्या असल्यातरी एकनाथ शिंदे यांचे सरकार बचावले असल्याचे स्पष्ट आहे. मात्र न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या एकूणच भूमिकेवर मोठे ताशेरे ओढले आहेत. पहिली दोन निरीक्षणे उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का.. प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती बेकायदेशीर.. त्यामुळे सभापती राहुल नार्वेकर यांचा निर्णय वादात.. कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही न्यायालयाचे म्हणणं . दहाव्या शेडूल नुसार कुठल्याही गटाला फुटीचा युक्तिवाद नाही. कुठलाही प्रस्ताव नसताना राज्यपालांनी बहुमताची चाचणी बोलावणं हे पूर्णपणे बेकायदेशीर.
न्यायालय राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय हा पूर्णपणे बेकायदेशीर सुप्रीम कोर्ट. पहिली चार निरीक्षणे उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने शिंदे गटाला पुन्हा अजून एक मोठा दणका.बहुमतासाठी कोणतेही कायदेशीर कारण नव्हते -न्यायालय
पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर करणे याबाबत राज्यपाल यांचा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर -सुप्रीम कोर्ट राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर कोर्टाचे मोठे ताशेरे. अविश्वासाचा ठराव करणारे पत्र राज्यपालांना का दिलं त्याऐवजी विधिमंडळात अविश्वास ठरावकांत आला फडणवीस आणि राज्यपाल यांचं निर्णय एकदम चुकीचा -न्यायालय.मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणं एकदम चुकीचं होतं सर्वोच्च न्यायालयाचे मत.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परस्थिती न्यायालयाला पूर्ववत करता आली असती , असं म्हणत शिंदे सरकार बचावले गेला असल्यास एकंदरीत दिसून येत आहे..



