रत्नागिरी:-ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे “चैतन्य भूषण ‘पुरस्काराने सन्मानित.
पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:-989031860

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे “चैतन्य भूषण ‘पुरस्काराने सन्मानित .
मायणी प्रतिनिधी-रत्नागिरी येथील चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे दिला जाणारा चैतन्य भूषण पुरस्कार सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ,सातारा याचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती डॉक्टर विकास खिलारे यांना जाहीर झाला असून दिनांक सात मे रोजी एक दिवशीय ज्योतिष संमेलनात साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे नुकताच प्रदान करण्यात आला .पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मान चिन्ह, पंचवीसे एक रुपया, राजमुद्रा, शाल, श्रीफळ असे होते हा पुरस्कार हा पुरस्कार चैतन्य ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मुळे व ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते तसेच एडवोकेट मालती शर्मा, कुलगुरू श्री विजय शास्त्री संग मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
डॉक्टर विकास खिलारे यांनी 2012 मध्ये वैद्यकीय व्यवसाय सोडून ज्योतिष शास्त्र या विषयात संशोधन केले असून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे.
ते गेली १४ वर्ष विवाह विषयक मार्गर्दर्शक व समुपदेशक म्हणून सातारा येथे कार्यारत आहेत.