ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-मुख्यमंत्री घेतात एक फुल.. पण, साताऱ्यात स्वागतासाठी लाखमोलाचे खुळ..?.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-मुख्यमंत्री घेतात एक फुल.. पण, साताऱ्यात स्वागतासाठी लाखमोलाचे खुळ..?.

(अजित जगताप). सातारा दि: गरिबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत केंद्राने ३० लाख घरे मंजूर केले आहेत. त्यापैकी पाच लाख घरांचे लोकार्पण सातारा भूमीत होत आहे. सध्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आर्थिक शिस्त लावण्यासाठी काटकसरीचा संदेश दिला आहे . तरी सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री दौऱ्याप्रसंगी स्वागताच्या वेळी एक फुल घेतात तरीही स्वागतासाठी लाखभर खर्चाचे खुळ काहीच्या डोक्यात शिरले आहे. त्यामुळे भाजप नेता बोले… पण, स्थानिक कार्यकर्ता ना डोले… अशीच अवस्था पाहण्यास मिळणार आहे. शुक्रवार दिनांक १५ मे रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह व सैनिक स्कूलच्या मैदानावर केंद्र शासनाने महाराष्ट्रातील महायुतीला या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपये निधी वितरण व सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातील पाच लाख प्रधानमंत्री आवास योजनेतील आवासाचे लोकार्पण सोहळा आणि नवनिर्वाचित भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे मार्केटिंग करण्यासाठी नामांकित एजन्सी साठी वार्तांकन व जाहिरात बाजी, कट आउट बॅनर व गर्दी दाखवण्यासाठी एस.टी.च्या ४०० बसेस , व्ही.आय.पी. पाहुण्यांच्या खाजगी व सरकारी हेलिकॉप्टर साठी साठी हेलिपॅड उभारण्याच्या हालचाली सुरू झालेले आहेत. चहापान-पंच पकवान असलेले भोजन व्यवस्था असा सर्वसाधारण दोन ते अडीच कोटी रुपयांचा भरीव निधी खर्च होणार आहे. सामान्य गरिबांच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाला साधे तोरण मिळणार नाही. पण, घरकुलाच्या दरवाजासाठी चावी प्रदान करण्यासाठी नेत्यांची छबी दिसावी. यासाठी प्रसिद्धीचे धोरण मात्र भाजपने आत्मसात केले आहे. साताऱ्यात कार्यक्रमाच्या रूपाने गंगा आली अंगणी… हात धुवून घे सजणी ..असे अनेक जण हात धुवून घेण्यास सज्ज झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशातील आर्थिक परिस्थिती बाबत विरोधकांच्या आवाजामध्ये सत्य असल्याचे दाखवून दिले आहे. हा पंतप्रधान मोदी यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. मेट्रो- इलेक्ट्रिक बस सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या. सोन्याची खरेदी टाळून परकीय चलनाची बचत करा.स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्या. हे जरी सांगितले असले तरी सध्या सातारा जिल्ह्यात मंत्री पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना गारवा मिळावा म्हणून शासकीय कार्यालय व विश्रामगृहातील पार्किंगच्या जागेवर उभे असलेल्या वाहने सुद्धा वार्तानुकूलित राहावे म्हणून वाहन चालू ठेवून पेट्रोल डिझेलचा सरास वापर केला जात आहे. सातारच्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदयांनी व व्हीआयपीने चार हेलिकॉप्टर पेक्षा एखाद छोटसं विमान परवडेल. हे त्रिवार सत्य आहे. पण, जनतेने बचत करावी आणि भाजप नेत्यांनी सरकारी खर्चात नेहमीप्रमाणे उधळपट्टी करावी. असा त्याचा अर्थ निघाला आहे. याबद्दल राजकीय निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बोले तैसे चाले.. त्याची वंदावी पाऊले.. अशी आता पाऊले राहिलेली नाहीत. हीसुद्धा खरं आहे. सातारा शहरात होणाऱ्या भव्य दिव्य नेत्र दीपक कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातील कार्यकर्ते जमले नाही तर अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी यांना आतापासूनच कार्यक्रमाला सक्तीने हजर राहण्याचे तोंडी आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. लाभार्थीसाठी पुरी भाजी फूड पॅकेट आणि व्ही.आय.पी. साठी काजू- बदाम असं ऐतिहासिक आदरतिथ्य सुद्धा होणार आहे. त्या साठी सुद्धा नामांकित एजन्सी पाचारण करण्यात आलेली आहे. भव्य दिव्य मंडप, पंखे, कुलर फक्त एका दिवसासाठीच लाभार्थीच्या नशिबी येणार आहेत. आता या घरकुलाची दर्जा दोन महिन्याचे दिसून येणार असली तरी साताऱ्यात आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ती यशस्वी पार पडावी. अतिथी देव भाऊ असतो. मुळे मुख्यमंत्री देवा भाऊ आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज चौहान साहेब यांच्यासह मान्यवरांना स्वागतामध्ये कुठेही कमतरता भासू नये. अशीही सदिच्छा काहींनी व्यक्त केली आहे.

2) सातारा:-रिपब्लिकन पक्षातून सग्राम रोकडे याचे निलंबन तर संतोष नलावडे यांची नियुक्ती…

सातारा दि::
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष संग्राम रोकडे यांना पक्षाच्या पदावरून तात्काळ निलंबित केले . तर तातडीने संतोष नलावडे यांची पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षातील शिस्त व कार्यकर्त्यांना इशाराही देण्यात आला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार व प्रदेश महासचिव दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एका बाजूला गैरवर्तन करणाऱ्यावर कडक कारवाई आणि दुसऱ्या बाजूला चांगले काम करणाऱ्यांची नियुक्तीने खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळीने कात टाकल्याचेच मानण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षातून निलंबित केलेल्या संग्राम रोकडे यांनी यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नाव, पद किंवा अधिकृत ओळख वापरल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असाही इशारा दिला आहे. तसेच नवनिर्वाचित वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री नलावडे यांचे पक्षात जोरदार स्वागतही करण्यात आले आहे.
फुले शाहू आंबेडकर चळवळीतील योगदानाची दखल पक्षाचे निष्ठावंत नेते मदन खंकाळ यांची तसेच वडार समाजाचे श्री सोमनाथ धोत्रे यांना जिल्हाध्यक्ष आणि वाहतूक आघाडीचे श्री संतोष नलावडे, आरोग्य आघाडीचे शेखर आडागळे यांची निवड करून रिपब्लिकन पक्षाचा विस्तार केलेला आहे. युवक जिल्हाध्यक्षपदी किरण ओव्हाळ, कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ मदाळे व शहराध्यक्ष शाहरुख शेख, बंटी गायकवाड, योगेश माने, सारंग ओव्हाळ, ईश्वर देव, यशवंत ओव्हाळ यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. युवा नेते राजेंद्र ओव्हळ
यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून त्यांनाही जबाबदारी देण्यात आलेली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाच्या वतीने संधी दिलेले आहे.त्यांनी पक्ष विस्तारासाठी परिश्रम घेतले आहे. या उलट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेल्या संग्राम रोकडे यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा आपल्या वाहतूक व गौण खनिज उत्खनन व्यवसायाला फायदा व्हावा या दृष्टीने अनेक कारणामे केले आहेत. त्यांच्याबद्दल आलेल्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन याबाबत स्थानिक पातळीवर चौकशी केली असता त्यांच्या विरोधातच त्यांच्याच गावातील अनेकांनी निवेदन देऊन वस्तुस्थिती मांडली आहे. संग्राम रोकडे यांना याबाबत सातत्याने खुलासा करण्याची संधी देऊन सुद्धा त्यांनी टाळाटाळ केली आहे. त्यांच्या काही गोष्टींबाबत पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी त्यांचे निलंबन केले असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. आता यापुढे संग्राम रोकडे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट कोणताही संबंध राहणार नाही. त्यांच्या कुठल्याही गैर व्यवहाराचे किंवा इतर गोष्टींचे कधीही पक्ष समर्थन करणार नाही असेही श्री दादासाहेब ओव्हळ यांनीपत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, कोणतीही पूर्व सूचना अथवा शासकीय पातळीवरती परवानगी न काढता पावती पुस्तक छापून पैसे गोळा केलेले आहेत. याच्याशीही रिपब्लिकन पक्षाचा संबंध नाही. याबाबत व्यक्तिशः श्री रोकडे यांच्याशी संबंधितांनी तक्रार करावी असेही सूचित केले आहे. यावेळी सोनगाव तालुका जावळी येथील अनेक ग्रामस्थांनी श्री दादासाहेब ओव्हाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाने खळबळ माजली आहे.

3) सातारा:-गुरुवार १४ मे रोजी भीम फेस्टिवल मध्ये साताऱ्यात चांडाळ चौकडीची करामती…..

(अजित जगताप). सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश ज्या भूमीत झाला आहे. त्या सातारच्या भूमीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने भव्य दिव्य भीम फेस्टिवलचे धुमधडाक्यात आयोजन केले आहे. साताऱ्यातील भीम फेस्टिवलचे हे चौथे वर्ष असून फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक मेजवानी ठरली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई, चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे, गणेश भिसे व विशाल कांबळे, रेखा सकटे यांच्या सहकार्याने अनेक आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत. ज्येष्ठ मार्गदर्शक बबनदादा करडे , अँड . राजेंद्र गलांडे,शशिकांत गंगावणे ,दत्ता सावंत, दादा सातपुते, सतीश कांबळे, सुहास मोरे, प्रशांत उबाळे, अविनाश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. इतिहासाच्या
सुवर्णपानातही दुर्लक्षित केलेले शिवपुत्र अद्वितीय छत्रपती, स्वराज्यरक्षक
शंभूराजे महाराज यांच्या १४ मे या जयंती दिनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त
जयंती महोत्सव साजरा होत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातील मनोरंजनाच्या मंचकावर अग्रस्थानी असलेल्या बारामतीच्या चांडाळ चौकडीच्या करामतीचा
हा मनोरंजनात्मक प्रबोधनाचा कार्यक्रम या भिम फेस्टिवलची आकर्षण ठरले आहे. राजकीय,
सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाची साक्षीदार कवी
दंगलकार नितीन चंदनशिवे याचे काव्यात्मक व्याख्यानाचे पर्व १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता आहे. सातारा शहरातील महात्मा गांधी मैदान, राजवाडा समोर होणाऱ्या या भीम फेस्टिव्हलचे उद्घाघाटन राज्याचे
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच प्रतिमा पुजन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि खा. नितीनकाका पाटील करणार
आहेत. सातारा पालकमंत्री तथा राज्य पर्यटनमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, पुनर्वसन मंत्री
ना. मकरंद आबा पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री .ना.जयकुमार गोरे,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, कराड उत्तरचे आ .मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास विशेष
उपस्थिती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण
गवई आणि रिपाई राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई साहेब उपस्थित राहणार आहेत. असणार आहेत. सातारा जि.प. उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, तसेच सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उप नगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांचेसह आजी माजी जिल्हा परिषद,
पंचायत समिती सभपती, सदस्य तसेच नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील
मान्यवरांनाही निमंत्रित केलेले आहे. रिपब्लिकन पक्षाचे सुहास मोरे, अॅड. पायल गाडे हे स्वागताध्यक्ष असतील. कार्यक्रम सुसुत्रबद्ध करण्यासाठी रविंद्र
वायदंडे, सुंदर ओव्हाळ, अनिल धोत्रे, सनी काटे, आशुतोष वाघमोडे, प्रथमेश
भंडारी, आबा मोरे, ऋतुराज चांदणे, दादा सातपुते, चंदा कांबळे, अर्चना बगाडे, नलिनी घाडगे, अविनाश भोसले, अनिल वायदंडे, सुरेश बैले, अजयशेठ
कांबळे, सतिश कांबळे, दत्तात्रय सावंत, रोहित भिसे, किरण बोभाटे, प्रशांत
किर्तीकुडाव, उल्हास गायकवाड, सुर्यकांत जाधव, प्रतिक गाडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. यापूर्वी साताऱ्यातील भीम फेस्टिवल मध्ये भीमसेन जॉली मोरे व सीमा पाटील, शीतल साठे व सचिन माळी, भीम गायिका कडूबाई खरात आणि आता चौथ्या वर्षी मनोरंजनाचा निखळ ग्रामीण भाषेतील चांडाळ चौकडी करामती सातारकरांसाठी सज्ज झाले आहेत. आईने उन्हाळ्यात मनोरंजनाचा गारवा पाहण्यासाठी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले आहे . त्यामुळे अनेकांनी आतापासूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाला धन्यवाद दिले आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button