मोरवाडी:-पुणे-मुंबई महामार्गावरील समस्या मीनाताई मोहिते यांच्या पाठपुराव्याने झाली दूर.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पुणे-मुंबई महामार्गावरील समस्या मीनाताई मोहिते
यांच्या पाठपुराव्याने झाली दूर.
मोरवाडी, दि. 18 (शफिक शेख):- पुणे-मुंबई महामार्गावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोरील ड्रेनेजचे झाकण मागील 20 ते 25 दिवसांपासून तुटून पडले होते. आरपीएस प्रेस रिपोर्टर असोसिएनशनच्या पुणे जिल्हाध्यक्षा सौ. मीनाताई मोहिते यांच्या दक्षतेमुळे आणि पाठपुराव्यामुळे केवळ 24 तासांमध्ये ते तुटलेले झाकण नवीन बसविण्यात आले आणि एका संभाव्य जीवितहानी टाळता आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-मुंबई महामार्गावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र, मलबार गोल्डच्या ज्वेलरी शॉपसमोरील ड्रेनेजचे झाकण मागील 20 ते 25 दिवसांपासून तुटून पडले होते. 2 – 3 दुचाकी वाहनेदेखील त्यास धडकून वाहनालकांना मार लागला होता. अनेक प्रयत्य करूनही ड्रेनेज विभागाकडून काही दखल घेतली जात नव्हती. अशातच दिनांक 17/11/2022 रोजी मीनाताई मोहिते यांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्यांनी तातडीने कारवाई करीत याविषयी संबंधित विभागात तक्रार दिली आणि त्वरित ते झाकण बसविण्याची विनंती केली. सदर विनंतीचा वारंवार पाठपुरावा करीत त्यांनी 24 तासांच्या आत ते झाकण बसवून या परिसरातील नागरिकांना दिलासा दिला. यामुळे परिसरातील नागरिकांकडून आरपीएस प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे आभार मानले जात आहेत.