ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज पोलिसांच्या हस्ते पोलीस पाटलांचा सत्कार.

प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

भुईंज पोलिसांच्या हस्ते पोलीस पाटलांचा सत्कार.

आज दिनांक १८/११/२०२२ रोजी सकाळी ११.१५ ते १२.२५ वा चे दरम्यान भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील बँक मॅनेजर, पतसंस्था मॅनेजर, ज्वेलरी दुकानदार, पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली. तेव्हा मीटिंगमध्ये भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाचे चौक, सराफा मार्केट, भाजी मंडई, महत्त्वाची ठिकाणे इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत व सुरक्षा रक्षक नेमणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्केटमधील दुकान समोर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील काही लोक कामानिमित्त बाहेरगावी राहत असून त्यांची गावात असणारी बंद घरे फोडून चोरीचे प्रकार झालेले आहेत. सदरच्या बंद घरांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू, रोख रक्कम ठेवू नयेत याबाबत सूचना द्याव्यात, गावामध्ये फिरणारे फिरस्ते, भंगार गोळा करणारे, ब्लँकेट विक्रेते, यांचेवर नजर ठेवावी. त्यांची चौकशी करून संशयित आढळून आलेस तात्काळ पोलीस ठाणेस कळवावे. गावामध्ये सीसीटीव्ही, सायरन, स्पीकर बसविणे बाबत सूचना दिल्या. सदर मीटिंग करिता ज्वेलरी दुकानदार, बँक/ पतसंस्था मॅनेजर ,पोलीस पाटील उपस्थित होते.तसेच भुईंज पोलिसांकडून पोलीस पाटलांचा सत्कार देखील करण्यात आला. सन 2022 मध्ये वार्षिक यात्रा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव या कालावधीत गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याकामी मौलिक कामगिरी बजावली व पोलीस प्रशासनास उत्कृष्ट सहकार्य केले तसेच गावामध्ये जनजागृती करण्यासाठी आपण केलेल्या विशेष योगदानाबद्दल व चांगल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button