आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वाईत भारत स्काऊट-गाईडचा प्रेरणादायी मेळावा; पथक नोंदणी कार्यशाळा व उद्बोधन वर्ग उत्साहात संपन्न.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वाईत भारत स्काऊट-गाईडचा प्रेरणादायी मेळावा; पथक नोंदणी कार्यशाळा व उद्बोधन वर्ग उत्साहात संपन्न.

सातारा | वाई :
भारत स्काऊट अँड गाईड, सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने आयोजित पथक नोंदणी कार्यशाळा व उद्बोधन वर्ग वाई येथील रमेश गरवारे स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यशाळेत वाई तालुक्यातील विविध शाळांतील स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, शिक्षक तसेच नव्याने सहभागी होणाऱ्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) साईनाथ वाळेकर, प्रताप माने (एल.टी.), जिल्हा संघटक (गाईड) सविता भोळे, जिल्हा संघटक (स्काऊट) बी. व्ही. राठोड, रंजना शिंदे (एल.टी.), सुधा कारंडे (एल.टी.), रमेश गरवारे स्कूलचे मुख्याध्यापक कौस्तुभ कानडे आणि सुनील खाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. स्काऊट ध्येयगीत व प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली.
प्रशिक्षण वर्गात भारत स्काऊट-गाईडची उद्दिष्टे, पथक नोंदणी प्रक्रिया, संघटनात्मक रचना, विविध उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, शिस्त, समाजसेवा तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी तथा मुख्यालय आयुक्त हर्षवर्धन मोरे यांनी स्काऊट-गाईड चळवळ ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. तर साईनाथ वाळेकर यांनी समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, स्वावलंबन आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा प्रशिक्षण वर्गांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनिता शिर्के, राधा कोंढाळकर (गाईड कॅप्टन) तसेच सर्व सहभागी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शाहीर शरद यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्काऊट मास्टर शिवाजी निकम यांनी केले. उपस्थितांनी हा वर्ग प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button