मुंबई:-सायबर फसवणुकीसाठी बनावट बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 7 आरोपी अटकेत, 10 लाखांची रोकड जप्त.
पत्रकार श्रीकृष्ण कोयंडे दादर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“सायबर गुन्हेगारांच्या बनावट बँक खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश; ७ आरोपी अटकेत,10 लाखांची रोकड जप्त – देशभरातील ५८ हून अधिक सायबर गुन्ह्यांशी संबंध उघड!”

मुंबई:-सायबर फसवणुकीसाठी बनावट बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ आरोपी अटकेत, 10 लाखांची रोकड जप्त.
मुंबई | प्रतिनिधी
सायबर फसवणुकीतून मिळालेला काळा पैसा विविध बनावट बँक खात्यांद्वारे फिरविणाऱ्या मोठ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची रोकड, १६ मोबाईल फोन, ३९ विविध कंपन्यांचे शिक्के, २३ सिमकार्ड, २२ चेकबुक, बँक खाते उघडण्याचे किट, कॅश काउंटिंग मशीन तसेच मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सायबर गुन्हे शाखेला २९ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, काही आरोपी Indian Overseas Bank, बोरीवली शाखेत मोठी रक्कम काढण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. पुढील तपासात भाईंदर पश्चिम व मीरा रोड परिसरातील कार्यालयांवर छापे टाकून आणखी आरोपींना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी सायबर फसवणुकीसाठी “म्युल अकाऊंट (Mule Account)” तयार करून त्यामार्फत फसवणुकीचा पैसा विविध खात्यांत वळवत असल्याचे उघड झाले. निष्पाप नागरिकांच्या नावावर अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाती उघडून त्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीत केला जात होता.
अटक आरोपींची नावे
सलमान हबीब पठाण (३४)
साजिद निशार अहमद कोठावाला (४६)
चिराग केतन टेपोणी (३९)
सय्यद वजाहत वाहिदुद्दीन (४७)
राकेश रामाशंकर मिश्रा (४२)
रहित के. हेजडे (३५)
आर्यन रितेश ठाककर (१८)
पोलिसांनी जप्त केलेल्या बँक खात्यांची राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर पडताळणी केली असता, या खात्यांचा वापर देशातील ५८ हून अधिक सायबर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचे देशव्यापी जाळे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल
10 लाख रुपये रोख
१६ मोबाईल फोन
३९ कंपन्यांचे शिक्के
२३ सिमकार्ड
२२ चेकबुक
बँक खाते उघडण्याचे किट
कॅश काउंटिंग मशीन
बनावट कागदपत्रे
बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, चेकबुक, बँक पासबुक आदी साहित्य
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागील इतर सूत्रधारांचा शोध सुरू आहे.
मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याचा वापर करू देऊ नये तसेच संशयास्पद व्यवहार तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.




