क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-खटावमध्ये तलाठीसह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या पथकाची धडक कारवाई.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-खटावमध्ये तलाठीसह कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या पथकाची धडक कारवाई.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात लाचखोरीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत तलाठी आणि कोतवाल या दोघांना लाचेच्या प्रकरणात जाळ्यात अडकवले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, संबंधितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विलास पांडुरंग नागरगोजे (वय ५१, तलाठी) आणि जगन्नाथ नामदेव उमापे (वय ४९, कोतवाल) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय शेतकरी तक्रारदार यांना एका पतसंस्थेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या कर्जाचा सातबारा उताऱ्यावर बोजा नोंदविण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३ हजार रुपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मंगळवारी पुसेसावळी येथील मंडळ व तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान तलाठी आणि कोतवाल या दोघांनाही एसीबीच्या जाळ्यात अडकवण्यात आले.
या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील संबंधित कलमान्वये औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार नितीन गोगवले, निलेश राजपुरे, गणेश ताटे, अजित कर्णे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ ०२१६२-२३८१३९ या क्रमांकावर संपर्क साधावा. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही विभागाने केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button