ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत; गावांच्या वेशीवर व शेतीत वाढला वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

पत्रकार अनंत जाधव मुंबई जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

दिनांक: ०५ ऑगस्ट

महाबळेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत; गावांच्या वेशीवर व शेतीत वाढला वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

अनंत शंकर जाधव
मुंबई / महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी या गावा लगतच्या परिसरामध्ये शनिवार दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी बिबट्याने अचानक धडक देत आपली एन्ट्री नोंदवली आहे. या बिबट्याच्या आगमनामुळे संपूर्ण भागातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली असून वनविभागाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत आहेत. बिबट्या थेट ग्रामस्थांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. तरीही सुस्त प्रशासन अद्याप झोपेत आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आला आहे. आम्हीभागातील एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यावरच वनविभागाचे डोळे उघडणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील परिसरात बिबट्याने तांडव मांडले असून ग्रामस्थ अक्षरशः मरणाच्या सावलीखाली जगत आहेत. लगतच्या परिसरात बिबट्या सर्रासपणे वावरताना दिसत आहे व त्याने पाळीव प्राण्यांचा ज्याप्रकारे फडशा पाडला आहे ते थरकाप उडवणारे आहे. बिबट्याने परिसरातील अनेक शेळी, कुत्री, कोंबडी यावर हल्ला करून ठार केले आहे. यापूर्वी एकांतात दिसणारा हा प्राणी आता थेट शेताच्या कडेला, रस्त्यालगत आणि वस्तीजवळ येऊ लागल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्याकरिता घाबरत आहेत. संध्याकाळ झाली की भागातील नागरिक भीतीने घराचे दरवाजे लावून घेत आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाने त्याची राखण करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. मुलांचे खेळणे, महिलांचे बाहेर जाने पूर्णपणे बंद झाल्याात जमा आहे.

शासनाने आणि वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ आणि कडक उपाययोजना लागू कराव्यात असे स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे. बिबट्याच्या वाढत्या दहशतीवर शासनाने केवळ आश्वासने न देता खालीलप्रमाणे कडक उपाययोजना अमलात आणाव्यात, अशी मागणी पत्रकार अनंत शंकर जाधव व ग्रामस्थांकडून केली जाताना दिसत आहे:

• बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा वस्तीजवळ तात्काळ पिंजरे लावून त्यांना गनिमीकाव्याने/जेरबंद करावे.
• वनविभागाच्या पथकाने रात्रीच्या वेळी रस्त्यांजवळ व गावांजवळ रोज विशेष गस्त घालावी.
• ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचे अचूक लोकेशन शोधावे व त्याप्रमाणे त्याला जेरबंद करण्याचे उपाय योजावेत व बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे.
• सौरऊर्जेवरील स्ट्रीट लाईट दिव्यांची सोय वस्ती बाहेर आणि शेतातील रस्त्यांवर शासनाने करावी.
• बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाळीव प्राण्यांची किंवा जखमी नागरिकांची आर्थिक भरपाई शासनाने त्वरित द्यावी.

यापुढे कोणतेही अनर्थ घडण्यापूर्वी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी हाक याभागातील जनता देत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button