ताज्या घडामोडी

खटाव तालुकास्तरीय आर एस पी बालसैनिक मेळाव्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

RPS STAR NEWS

खटाव तालुकास्तरीय आर एस पी बालसैनिक मेळाव्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ.

रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण(RSP & CD) महाराष्ट्र राज्य
( पोलीस विभाग व शिक्षण विभागाचे अधिकारांतर्गत)
खटाव तालुकास्तरीय बालसैनिक मेळावा दिनांक 20 व 21 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे सदर मेळाव्याच्या उद्घाटनासाठी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब उपस्थित होते
तसेच ट्रीनिटी इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्राचार्य मृदुला बॅनर्जी मॅडम व छत्रपती शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेज वडूज चे प्राचार्य डूडूनी सर उपस्थित होते. तसेच सदरच्या मेळाव्यासाठी ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून सातारा पोलीस ऋतुजा चिमगावे मॅडम तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर श्री नलवडे बापू उपस्थित राहिले.
खटाव तालुक्यातील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सात ते आठ शाळांमधुन बालसैनिक मेळाव्या मध्ये सहभाग नोंदविला आहे. सदर मेळाव्याचे आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूलचे आर एस पी अधिकारी व तालुका समादेशक खुडे सर यांनी केले आहे. सदर मेळाव्यासाठी हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज चे आर एस पी अधिकारी राऊत सर, तसेच श्री सिद्धेश्वर विद्यालय कुरोली चे आर एस पी अधिकारी देशमुख व्ही पी, श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटाव च्या आर एस पी अधिकारी सौ गवळी मॅडम व ढोणे एम एस मॅडम छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज चे आर एस पी अधिकारी हुंबे सर उपस्थित होते. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनांमध्ये रस्ता सुरक्षा आजच्या काळामध्ये किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगून रस्त्यावरती वावरत असताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे व रस्त्यावरील अपघात कशा पद्धतीने टाळले जातील याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तालुक्यातील बालसैनिकांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खटाव तालुका आर एस पी अधिकारी सौरभ चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुडे सर यांनी केले. आभार श्री राऊत सर यांनी मानले व उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button