ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-आमदारांपाठोपाठ आता सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत मेंबरची पळवा पळवी,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित  जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित  जगताप सातारा

आमदारांपाठोपाठ आता सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत मेंबरची पळवा पळवी,,,,

सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठा व वैचारिक बैठक खुंटीला ठेवून आमदारांनी पक्ष बदलू व धोरण बदलू प्रमाणे वागणूक सुरू केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एका गावात निवडणुकीच्या तोंडावरच ग्रामपंचायत मेंबरची पळवा पळवी झाल्याने चर्चेला उधाण आलेले आहे. उपसरपंच निवडी पूर्वी नाट्य घडले आहे.
याबाबत माहिती अशी की ,उत्तर कोरगाव येथील एका राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या व पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका गावामध्ये सध्या उपसरपंचाच्या निवडीची चर्चा सुरू होती. सर्व आकडेवारी बेरीज वजाबाकी सर्व व्यवस्थित चालले होते .इतक्यात सायंकाळी निरोप आला. आपल्यातील मेंबर फुटून दुसऱ्या गटांनी पळवल्याची बातमी गावात पसरली आणि गावामध्ये राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आलेले आहे. तीन गटाचे मेंबर फुटल्याने तीन तिघाड काम बिघाड झाल्याने राजकीय धुळवड पहाण्यास मिळत आहे.
मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदारांची जशी पळवा पळवी झाली तशा पद्धतीने उत्तर कोरेगावातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या या गावात सदस्याची पळवा पळवी झाल्याने ज्यांनी उपसरपंचासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्याची मात्र झोप उडाली आहे. अडीच वर्षापूर्वी या गावातील निवडणूक झाली होती. त्यानंतर सरपंच व उपसरपंच निवडी झाल्या होत्या. यामध्ये सरपंच पद आरक्षित असल्याने उपसरपंच पद वाटून देण्याचे ठरले. पण, घोळात घोळ सुरू झाला. त्या मेंबरने पहिल्या गटाची दोर कापली आहे.तर दुसऱ्या गटाने लगेच गाठ बांधून घेतली . आता मौजमजा करूनच हे महाशय थेट गावात येतील असा कयास आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button