खटाव:-शिवप्रतापचा”पाचशे कोटीचा व्यवसाय.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
शिवप्रतापचा”पाचशे कोटीचा व्यवसाय.
मायणी प्रतिनिधी__सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून विट्याच्या शिवप्रताप मल्टीस्टेट ची ओळख आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत प्रतापराव साळुंखे दादा यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने कौतुकास्पद कामगिरी केली आहे संस्थेने बावीस वर्षात पदार्पण केले असून 2002 सालीविटा येथे अत्यंत कमीजागेत प्रसिद्ध सोने-चांदी व्यवसायिक प्रताप शेठ दादा साळुंखे यांनी या संस्थेची बीज रोवली तत्कालीन परिस्थिती दुष्काळ ची होती अनेक बँका पतसंस्था बुडीत निघत होत्या अत्यंत धीट पणे प्रताप शेठ साळुंखे दादांनी पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेऊन संस्था चालवलीच नाही तर आज अखेर हित आणि समाधान जोपासणारे सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था बनली एका शाखेपूर्ती सुरू झालेली संस्था आज महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात ग्राहकांना अत्यंत पण देणे सेवा देत असून संस्थेने 500 कोटीचा व्यवसाय पार केला आहे संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढत असताना लवकरच संस्था देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे प्रवेश करीत असून तिथे दोन शाखेच्या माध्यमातून सेवा देण्यास सज्ज आहे शेतकरी महिलांसाठी नाविन्यपूर्ण योजना___याशिवाय विद्येचे माहेरघर पुणे येथे संस्था आपली शाखा सुरू करणार आहे संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर करण्याच्या दृष्टीने तामिळनाडू व केरळ या दोन राज्यात सेवा सुरू करण्याचा मानस आहे संस्थेने नेहमीच ग्राहक उपयोगी योजना राबवली आहे महिलांचे सबलीकरण करण्यासाठी बचत गटांना लघु कर्ज संस्थेत उपलब्ध करून दिले जाते तरुणांना व्यवसायासाठी शिक्षणासाठी संस्था कर्ज पुरवठा केला जातो शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जाते तारण कर्ज अंतर्गत पाच मिनिटाच्या आत ग्राहकांना पैसे दिले जातात एकंदरीत अडचणीत असलेल्या व्यक्तीस अगदी आपुलकीने कोणताही भेदभाव न करता सेवा पुरविली जाते त्यामुळे शिवप्रताप आणि ग्राहकांची अतूट नाती निर्माण झाली आहे ठेवीला ग्राहकांच्या प्रथम पसंतीची संस्था__ग्राहकांच्या ठेवीला मोठे प्रमाणात सुरक्षितता दिली जाते ठेवीला आकर्षक व्याजदर दिला जातो विविध योजनांच्या आधारे ग्राहकाचे समाधान केले जाते त्यामुळे शिवप्रताप ग्राहकांच्या पसंतीला उरलेली पहिली संस्था आहे संस्थेची प्रगती होत असताना चेअरमन प्रताप दादा साळुंखे व्हाई चेअरमन हनुमंतराव सपकाळ कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे सर्व संचालकांचा मोठा वाटा आहे याशिवाय ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे कर्मचारी सभासद ग्राहक वकील इंजिनियर यांचाही संस्थेच्या प्रगतीत वाटा आहे याबाबत प्रतापराव साळुंखे दादा म्हणाले सभासदांचे विश्वासावर शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने चौफेर प्रगती केली आहे केरळ तामिळनाडू येथे संस्थेच्या शाखा सुरू करण्याचा मानस आहे तसेच विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेने काळानुसार बदल केला आहे संस्थेने 500 कोटीचा व्यवसाय पूर्ण केला आहे नजीकच्या काळात परराज्यासह मुंबई पुणे शिराळा पेठ वडगाव आष्टा येथे शाखा सुरू करणारा आहोत सातारा जिल्ह्यातील मायणी येथील या या संस्थेच्या शाखेने देखील चौफेर प्रगती केली असल्याचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले.