पुणे:-एडवोकेट श्रीराम देव यांना ज्योतीर्विद्या वाचस्पती (पीएचडी )पदवी प्रधान.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
एडवोकेट श्रीराम देव यांना ज्योतीर्विद्या वाचस्पती (पीएचडी ) पदवी प्रधान.
मायणी प्रतिनिधी_सातारा येथील प्रथित यश अडवोकेट श्रीराम भालचंद्र देव यांना वराहमहिर मुक्त विद्यापीठातर्फे ज्योतीर्विद्या वाचस्पती (पीएचडी )पदवी नुकतीच पुणे येथील कार्यशाळेत कुलपती नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचा कुंडलीचा संशोधनात्मक अभ्यास हा प्रबंधाचा विषय होता. यावेळी कुलगुरू आनंदकुमार कुलकर्णी कुलसचिव एडवोकेट मालती शर्मा व्यवस्थापक नयना जकातदार प्रिया मालवणकर तसेच पुणे येथील मनसे सरचिटणीस ऍडव्होकेट किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऍडव्होकेट श्रीराम देव हे व्यवसायाने वकील असले तरी ज्योतिषशास्त्राची त्यांना खूप आवड आहे सातारा येथील ज्योतिष मंडळाचे ते सचिव असून यापूर्वी त्यांनी ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर या परीक्षा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रख्यात ज्योतिष भास्कर प्राचार्य रमणलाल शहा यांनी त्यांना ज्योतिषाचार्य या पदवीने सन्मानित केले होते त्यांना ज्योतीर्विद्या वाचस्पती पदवी मिळाल्याने त्यांचे प्राचार्य रमणलाल शहा गोविंद कोष्टी सपना पवार पद्मा कासट मिलिंद कुलकर्णी माजी प्राचार्य दिलीप पुस्तके यांनी अभिनंदन केले.