पुसेसावळी:- बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांना व बस चालकांना दरवर्षीप्रमाणे करावी लागत आहे तारेवरची कसरत.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पुसेसावळी बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांना व बस चालकांना दरवर्षीप्रमाणे करावी लागत आहे तारेवरची कसरत
प्रतिनिधी — प्रमोद देवाडिगा सातारा :-9623714741
जर वर्षी प्रमाणे पुसेसावळी बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून प्रवासी व बस चालक त्रस्त झाले आहेत त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे खड्ड्यातून वाहण चालकांना वाहण चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे हाल होत आहेत. पुसेसावली बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पुसेसावली परिसरात आजूबाजूची बरीच छोटी मोठी खेडी आहेत पुसेसावळी येथून कराड वडूज सातारा सांगली पुणे मुंबईला व इतर ठिकाणी जाण्यासाठी मोठी वर्दळ असते. तर बस्थानाकच्या मुख्य वाटेपासून ते बस्थानाकपर्यंत पाण्याने साचलेल्या छोट्या व मोठ्या खड्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. पुसेसावली बस स्थानकात मोठया.प्रमाणावर खड्डे पडले आहेत यामध्ये पावसाचे पाणी साचते त्यामुळे त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे कित्येक अपघात झाले आहेत त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून व विद्यार्थ्यांकडून होत आहे..