ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-शहर अधोगतीकडे जाणारा अर्थसंकल्प- नाना काटे

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

शहर अधोगतीकडे जाणारा अर्थसंकल्प- नाना काटे
पिंपरी, दि. 15 (शफिक शेख) :- शासकीय राजवटीतील पिंपरी चिंचवड शहर मागील पाच वर्षे कारभार पाहणारे सत्ताधारी भाजपमुळे अधोगतिकडे गेले असल्याचे आज महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (दि. 14) सादर केलेले अंदाजपत्रकातून दिसून येत आहे. शहरासाठी नविन अथवा ठोस प्रकल्प असा एकही तरतूद यामध्ये दिसून येत नाही. केवळ पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्पावर मलमपट्टी करणारे अंदाजपत्रक आहे, अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
महापालिकेचे ४४ वे व प्रशासकीय राजवटीतील पहिले अंदाजपत्रक शेखर सिंह यांनी आज सादर केले. जे सर्व प्रकल्प मागील सत्ताधारी भाजपच्या काळात मान्यता देऊन वर्कऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. तेच जुने प्रकल्प नव्याने दाखवून काहीतरी नवीन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. केवळ पाच वर्षांपासून रखडलेल्या कामावरतीच काम करत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधोरेखीत केले आहे. विरोधकाकडून जे प्रकल्प सुरू केल्याचा कांगावा केला जातो तेच प्रशासकीय राजवट करत आहे.
एकेकाळी सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मागील पाच वर्षाच्या चुकीच्या कारभारामुळे दिवाळखोरीकडे निघालेली आहे. कारण चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नही घटल्याचे दिसून येते. मागील वर्षी उत्पन्नाचा अंदाज आणि यंदाच्या उत्पन्नाच्या अंदाजात यात तीनशे कोटींहून अधिक रक्कमेची कमतरता स्पष्ट दिसते याचा थेट परिणाम शहरातील विकासावरती होणार आहे. शहरवासीयांच्या पदरी निराशा येणारा हा अर्थसंकल्प आहे, असे नाना काटे यांनी केली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button