ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर.

प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा:- 9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा.

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार – माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर.

-माळी बंधूंचा सत्कार करताना मा.आ.डॉ.दिलीपराव येळगावकर,सचिव रविंद्रशेठ बाबर व इतर मान्यवर) मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार असे उद्गार संत सद्गुरु मातोश्री सरु ताई माऊली ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांनी सद्गुरु सरुताई यांच्या प्रकट दिनानिमित्त बोलताना काढले. यावेळी ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर,डॉ.एस.एन पवार,जालिंदर माळी,अंकुश रजपूत,पांडुरंग लोहार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी वडूज येथील माळी बंधू यांनी २किलो १००ग्रॅम वजनाच्या सरूताईंच्या पादुका त्रस्टला अर्पण केल्या.त्याबद्दल माळी बंधू यांचा डॉ.येळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिनांक १३ रोजी सकाळी सरुताई लिलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले.रात्री९वाजता चींचनेर येथील प्रसिद्ध भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.सकाळी आरती नंतर अशोक महाराज मांडवे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.दुपारी ठीक १२वाजता मा. आ.डॉ .येळगावकर यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली. याप्रसंगी डॉ.येळगावकर म्हणाले,यापूर्वी मायणी ला देवस्थानचा क वर्ग दर्जा आम्ही मिळवून दिला होता, तो आता ब वर्ग दर्जा कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहू. ट्रस्टला सद्गुरु सरुताईं माऊली यांच्या चांदीच्या पादुका भेट दिल्याबद्दल माळी बंधू यांचे त्यांनी कौतुक केले. सरुताई यांच्या श्वानाने दाखवलेल्या जागेवर आम्ही त्यांचे मंदिर उभे केले.गोशाळा,सभागृह,भक्त निवास अशा सुविधा केल्या.अजूनही विकास करणार आहोत.या मंदिरात येण्यास कुणालाही मज्जाव नाही,राजकारणाला येथे थारा नाही. यशवंत बाबा यात्रेच्या वेळी चावडी जवळ भारुड भजनाची परंपरा आहे ती आम्ही अखंड चालू ठेवू.त्यादिवशी आम्ही खिरीचा प्रसाद वाटतो.हीच परंपरा पुढे राहील.असे सांगून त्यांनी ट्रस्टच्या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास पत्रकार व भाविक उपस्थित होते.प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button