ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- एकच मिशन जुन्या पेन्शनसाठी एकवटला सातारा.
प्रतिनिधी:-अमोल भोसले सातारा:-9922353739

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दिनांक:-१४/०३/२०२३
सातारा:- एकच मिशन जुन्या पेन्शनसाठी एकवटला सातारा.
आज सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या मागण्या साठी संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंद केला . यामध्ये सातारा जिल्ह्यतील सर्व कार्यालय कर्मचारी यांचे विना ओस पडली असुन् कर्मचारी यांनी आपल्या मागण्या वर सर्व संघटना ठाम असून कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाही असा ठाम निर्णय घेऊन कर्मचारी आपल्या मागण्या साठी ठाम आहेत.
आज सातारा पंचायत समिती सातारा मधील सर्व संवर्ग कर्मचारी यांचे मा.श्री.जितेंद्र कणसे , कनिष्ठ सहाय्यक यांनी आंदोलन आणि मोर्चाचे नियोजन केले.