पुणे निगडी:-साईनाथ नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे.
साईनाथ नगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी.
निगडी, दि. ११ (शफीक शेख) :-
साईनाथ नगर येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. परिसरातील सर्व मुलांनी एकत्र येऊन चौकामध्ये भगवे झेंडे, रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले. महाराजांचे पोवाडे लाऊन परिसरामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली.
संध्याकाळी महाराजांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रे मध्ये साईनाथ नगर मधील समस्त नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील बाळ गोपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सचिन चिखले, राहुल भाऊ येवले, संजय भाऊ बोराडे, सारिकाताई चव्हाण उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल साईनाथ नगर आणि एकता मित्र मंडळ यांनी केले. प्रसाद फिरोदिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि बालाजी जामदार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.