आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-मातोश्री सरुताई प्रकट दिन सोहळा 14 रोजी मंगळवारी.
प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मातोश्री सरुताई प्रकट दिन सोहळा 14 रोजी मंगळवारी
प्रतिनिधी मायणी_मायणी येथील संत परंपरेतील संतश्रेष्ठ मातोश्री सरुताई माऊली यांचा प्रकट दिन सोहळा दिनांक 14 रोजी मंगळवारी भावपूर्ण वातावरणात संपन्न होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर यांनी दिली. मंगळवारी पहाटे पाच वाजता माऊलीचा अभिषेक सकाळी सात वाजता आरती त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता अशोक महाराज मांडवे यांचे कीर्तन
दुपारी बारा वाजता माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते महाआरती त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून सरूताई प्रेमी सर्व मातोश्री प्रेमी व सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र बाबर रवींद्र बाबर आणि ट्रस्टने केले आहे.