खटाव:-पुसेसावळी आणि औंध पोलीस ठरले जिल्ह्यामध्ये अव्वल:- पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान.
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पुसेसावळी :- पुसेसावळी आणि औंध पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावत मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवल्याने पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे व पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे तसेच सहकाऱ्यांचा जिल्हा पुरस्काराने सन्मान केला. या परिसरातील येळीव येथील केबल चोरी तसेच अंबवडे येथिल ट्रॅक्टर चोरी , पवनचक्कीवरील केबल चोरी, चोराडे येथील पेट्रोल पंपावरील चोरी, अशा घटनांमुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या चोरीच्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या चोरी प्रकरणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीच्या घटनांचा छडा लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. औंध व पुसेसावळी पोलिसांच्या या गौरवास्पद कामगिरीचे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आणि आभार मानले.