ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बारामती नेतृत्व शब्दांत नाही, कृतीत दिसते; रोहित पवारांचे दुःखातही कर्तव्यभाव”

पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

बारामती नेतृत्व शब्दांत नाही, कृतीत दिसते; रोहित पवारांचे दुःखातही कर्तव्यभाव”

बारामती
विमान अपघातात निधन झालेले विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दु:खद घटनेनंतर स्वतः वैयक्तिक दुःखातून जात असतानाही आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या कठीण प्रसंगी धीर दिला. “हा आघात शब्दांत व्यक्त करता येणार नाही, मात्र या संकटाच्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांना मानसिक आधार दिला.
रोहित पवार यांनी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच भविष्यात आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कर्तव्य बजावत असताना आपले प्राण गमावलेल्या विदीप जाधव यांच्या सेवेला यावेळी त्यांनी आदरांजलीही वाहिली.
स्वतःच्या दुःखावर संयम ठेवून इतरांच्या वेदनांशी एकरूप होणे म्हणजेच खरे नेतृत्व होय, आणि रोहित पवार यांनी आपल्या या संवेदनशील कृतीतून ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button