ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्व. चव्हाणसाहेबांना केले अभिवादन….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्व. चव्हाणसाहेबांना केले अभिवादन….

सातारा दि.२- महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा सदस्य श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड दौरा केला.येथील महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रितीसंगम समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून नतमस्तक झाल्या. तसेच मनःपूर्वक अभिवादन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आश्रयस्थान म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विचार होय. अनेकदा राज्याचे धडाडीचे नेते अजित दादा पवार यांनी अनेकदा या प्रीतीसंगम स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यावर आली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राज्याचा कारभार करण्यापूर्वीच आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मारकाला भेट दिली.

यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, बाळासाहेब सोळसकर- पाटील, श्रीनिवास शिंदे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह नगरसेवक- नगरसेविका व विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार त्यांच्या समर्थक यावेळी मोठ्या उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे नगरीत आल्या होत्या. या दौऱ्याला दुःखाची झालर असल्यामुळे फारसा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर अजित दादा पवार यांचे अनुपस्थिती जाणवत होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मारक समाधी स्थळी शांतता पसरली होती. यावेळी उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून नतमस्तक झाल्या. एवढे अनेकांचे डोळे पाणावले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नाते अखेर पर्यंत टिकले होते. पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांची अनुपस्थिती पाहून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुन्हा एकदा पोरका झाल्याची भावना दिसून आली.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अनेकदा भावनिकरित्या या स्मारकाच्या तिथे जाऊन आपल्या मनातील कामना बोलून दाखवल्या. झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना केली. राजकीय यश मिळाल्यानंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारांची शपथ घेऊन राज्यकारभार सुद्धा केला. आज अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रीती संगमावरील स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मारक स्थळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुद्धा आठवणी दाटून आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button