साताऱ्यात स्री बीजातील मोठी गाठ काढण्यास शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला यश.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्यात स्री बीजातील मोठी गाठ काढण्यास शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाला यश.

सातारा दि: सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या स्त्री बीजातील पंधरा किलो वजनाची गाठ काढण्यास यश मिळाले आहे.

ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे व जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल् चिकित्सक
डॉ. युवराज करपे आणि डॉ. इनामदार मॅडम व डॉ. शिकलगार यांनी मार्गदर्शन केले
एका गरीब कुटुंबातील महिलेच्या पोटावर मोठी सूज आली होती. असाह्य वेदना होत असल्याने स्रीरोगशल्य विभागात दाखल करण्यात आले. तिच्या आवश्यक तपासण्या केल्यानंतर रुग्णाला ३० × २७ × २८ सें.मी. आकाराचा प्रचंड मोठी गाठ अंडाशयावर असल्याचे निदान झाले. बरेच दिवस तातडीने उपचार न केल्यामुळे ही गाठ मोठी झाली होती. शस्त्रक्रिया केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आणि जोखमींचा सखोल अभ्यास केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
दोन आठवड्यापूर्वीच ही अवघड शस्त्रक्रिया डॉ. सदाशिव देसाई यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शैलेश खडतरे, डॉ. पूजा गोयल, डॉ. किरण डव्हळे आणि डॉ. श्रावणी राऊतमारे यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. निलेश वैद्य, डॉ. सौरभ मोरे आणि डॉ. नीलम कदम यांनी जबाबदारी सांभाळली. नर्सिंग स्टाफ अधिकारी सौ. तन्वी कुर्णे आणि नर्सिंग अधिकारी अशरफ मुल्ला ह्यांची मोलाची कामगिरी होती व यांनी शस्त्रक्रियेदरम्यान सहकार्य केले.
ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्रीरोगशल्य वॉर्डचे नर्सिंग स्टाफ अधिकारी श्रीमति अनीता मसुगडे व इतर नर्सिंग अधिकाऱ्यांनी तिची काळजी घेतली व शस्त्रक्रियेला तयार केले. शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानंतर त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आले. नंतर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन व औषध पाणी देऊन घरी सोडण्यात आले.
ग्रामीण भागातून आलेल्या गरीब महिलेने पोटात पंधरा किलोची गाठ घेऊन उघडलेल्या अवस्थेत दैनंदिन कामकाज केले होते. त्या महिलेला शस्त्रक्रियेनंतर खूप आराम मिळाला. तसेच हलके हलके वाटले.
शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रियेसाठी सहभागी झालेले सर्व वैद्यकीय अधिकारी हे देवदूता सारखे धावून आले होते.खऱ्या अर्थाने त्या महिलेला आरोग्याचा लाभ मिळाला आहे. शासकीय रुग्णालय म्हणजे आरोग्य मंदिर बनले आहे. याची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. तसेच सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. खाजगी वैद्यकीय दवाखान्यात याच शस्त्रक्रियेसाठी किमान चार ते पाच लाख रुपये खर्च करावा लागला असता. परंतु, शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यामुळे गरिबांना न्याय मिळाला आहे.




