श्रीरामपूर:-माळेवाडीच्या भक्ती रोठेची जिल्ह्यात चमकदार कामगिरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माळेवाडीच्या भक्ती रोठेची जिल्ह्यात चमकदार कामगिरी.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )– महाराष्ट्र राज्य कला सांस्कृतिक आणि शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तर वैयक्तिक गीतगायन स्पर्धा अहिल्यानगर शहरात मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.किलबिल गटात जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडीची इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी भक्ती निलेश रोठे हिने वैयक्तिक गीतगायन’ सर्धेत स्वतः हार्मोनियम वाजवून ” बलसागर भारत होवो ” हे देशभक्तीपर गीत सादर केले.तिला सादरीकरणाचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक प्राप्त झाला.या यशासाठी तिला तिचे आजोबा चौधरी महाराज, वर्गशिक्षिका मीनाक्षी जाधव,कलाशिक्षक रज्जाक शेख, तसेच मुख्याध्यापक राजू भालेराव, मंगल सातुरे, आणि बाबासाहेब थोरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. भक्तीचा माळेवाडीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य, सोसायटी चेअरमन आणि संचालक, पोलिस पाटील, तंटामुक्त गाव समिती आदींनी शाळेत सत्कार केला.जिल्हा स्तरावरील यशाबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख केंद्रसमन्वयक आदींनी अभिनंदन केले आहे.




