आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-(सातारा)-मलकापूर पंचक्रोशी हादरली! मळाई ग्रुपकडून अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) मलकापूर पंचक्रोशी हादरली! मळाई ग्रुपकडून अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कराड दि. ०३ : मलकापूर पंचक्रोशी व मळाई ग्रुपच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. बारामती येथे घडलेल्या दु:खद घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभर हळहळ व्यक्त होत असताना, मलकापूर परिसरातही शोकसागर उसळला.
या वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात धडाडीचे नेतृत्व, स्पष्टवक्तेपणा व कामाचा माणूस अशी ओळख निर्माण करणारे अजित पवार तसेच त्यांच्यासोबत असलेले सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेण्डंट पिंकी माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याच कार्यक्रमात मळाईदेवी शिक्षण संस्थेचे संचालक वसंतराव चव्हाण (गुरुजी) यांचे सुपुत्र स्व. सुनील चव्हाण तसेच संस्थेचे हितचिंतक व पालक स्व. अधिक राजाराम थोरात यांच्या दुःखद निधनाबद्दलही उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास मलकापूर, नांदलापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर येथील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

2) वाई:-रस्ते,आरोग्य,रोजगार… यशवंतनगरचा विकास ‘ऑन ट्रॅक’!
बापूसाहेब शिंदेंचा ठाम शब्द : शेतीला बाजार, महिलांना बळ, जनतेला सुविधा.

वाई प्रतिनिधी
वाई यशवंतनगर गटातील उमेदवार श्री. दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पश्चिम भागाच्या विकासाचा स्पष्ट आणि ठोस आराखडा मांडला. शेती, पर्यावरण, आरोग्य सुविधा आणि महिला सक्षमीकरण या चारही आघाड्यांवर परिवर्तन घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम भागात शेती व पर्यावरणासाठी मोठी संधी असून, मकरंद आबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे दळणवळण सुरळीत होत आहे. रस्ते पूर्ण झाल्यानंतर या भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. स्थानिक युवकांना काम मिळेल आणि छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
आरोग्य सुविधांच्या बाबतीत बोलताना त्यांनी सांगितले की यशवंतनगर गटात मालतपूर व वेलग येथे दोन आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. सध्या मालतपूर येथे तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य केंद्र सुरू असून, मंत्री महोदयांच्या माध्यमातून पाठपुरावा करून ही दोन्ही केंद्रे लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने उभारली जातील, असा ठाम शब्द त्यांनी दिला.
महिला सक्षमीकरणावर भर देताना बापूसाहेब शिंदे म्हणाले की गावागावातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी सुरू केलेल्या घरगुती उद्योगांना चालना दिली जाईल. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत उद्योगांना प्रसिद्धी मिळवून दिली जाईल, जेणेकरून महिलांचे आर्थिक स्वावलंबन अधिक मजबूत होईल.
✨ “विकास केवळ घोषणा नाही, तर कृतीतून दिसला पाहिजे — आणि तोच आमचा मार्ग आहे,”
असा ठाम विश्वास व्यक्त करत बापूसाहेब शिंदे यांनी यशवंतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन 
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button