माळेवाडी:-(श्रीरामपूर)-हरेगावातील डॉक्टरांची २४ तास सेवा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हरेगावातील डॉक्टरांची २४ तास सेवा.

माळेवाडी / श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) हरेगाव येथे रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याचे नागरिकांना उडचणींचा सामना करावा लागत होता . या गंभीर प्रशाबाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली युवा जिल्हा महासचिव सुनील वाघमारे तालुका उपाध्यक्ष विशाल पठारे , संघटक योगेश घोडके आणि कार्यकत्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडे मागणी केली . अखेर या मागणीला यश आले असून हरे गावातील खाजगी डॉक्टरांना २४ तास शिक्टप्रमाणे वैद्यकीय सेवा देण्यासाठी पंचायत सामितीकडून पत्र जारी करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे गरविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत खाजगी डॉक्टरांना रात्री शिफ्टरमाणे थांबविण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली या मागणीची दखल घेत वैद्यकीय अधिकारी सुनील राजगुरू यांनी हरेगाव येथील डॉ मोहन ‘ डॉ खरात . डॉ बोरा . डॉ ताके . यांना २४ तास सेवा देण्याबाबत आदेशात्मक पत्रक जारी केले त्यामुळे आता हरेगावच्या उंदिरगाव माळेवाडी महांकाळ वाडगाव नागरिकांना रात्रीच्या वेळेसही वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




