वाई मध्ये संत रोहिदास जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई मध्ये संत रोहिदास जयंती निमित्त कार्यक्रमांचे आयोजन.
वाई प्रतिनिधी- वाई शहरात नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन होते यावेळी शहरातील लोकसहभाग हा तितकाच नाविन्यपूर्ण व उत्साहवर्धक असतो संत रोहिदास जयंती निमित्त वाई शहरातील रविवार पेठ या भागामध्ये चर्मकार समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
संतश्रेष्ठ रोहीदास महाराज15 व्या ते 16 व्या शतकातील भक्ती चळवळीचे कवी-संत होते.
त्यांनी भारतभर फिरून महान कार्य केले.
ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते.त्यांनी कुलभूषण कवी म्हणून ओळख मिळवली.
शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले.
त्यांनी लक्षणीय योगदान केले.
त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. ते उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या आधुनिक प्रदेशांमध्ये गुरू (अध्यात्मिक शिक्षक) म्हणून पूजनीय होते.
या महान संतांच्या ययंती निमित्त रविवार पेठ या भागामध्ये मंडळाच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सार्वजनिक वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, व धार्मिक कार्यक्रम त्याचबरोबर महाप्रसादाचे आयोजनही संत रोहिदास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे सायंकाळी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वाई शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगतात होणार आहे.
दरवर्षी संत रोहिदास गणेशोत्सव मंडळ रविवार पेठ या मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होते यावेळी लोकसहभाग हा उत्साहवर्धक असतो सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमातून समाजाची एकी व संस्कार मंडळाच्या वतीने साकारले जातात गणेशोत्सवामध्ये संत रोहिदास मंडळाच्या वतीने दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन होते त्यामुळे वाई शहरांमध्ये संत रोहिदास मंडळ लोकोपयोगी चळवळीमध्ये अव्यातपणे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे रविवार पेठ हा भाग बहुजनांचा भाग म्हणून ओळखला जातो या सांस्कृतिक नगराची ओळख पारंपारिक उत्सव व एकी मुळे नेहमीच अधोरेखित होत आली आहे याही वर्षी संत रोहिदास मंडळाच्या वतीने संत रोहिदास जयंती निमित्त अनेक लोकोपयोगी कामे मंडळाने हाती घेऊन आपले नाविन्यपूर्ण अस्तित्व अधोरेखित केले आहे या कार्यक्रमासाठी विविध स्तरातून शुभेच्छा ही येत आहे तसेच वाई शहरातील मान्यवरांनी व सर्वसामान्य नागरिकांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले या कार्यक्रमांमध्ये सर्व समाज माध्यमांनी उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संत रोहिदास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.