दिघी:-आर्मी पब्लिक स्कूल दिघी’मध्ये ‘ट्राउवेल’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:- 8208717483
‘आर्मी पब्लिक स्कूल दिघी’मध्ये
‘ट्राउवेल’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
दिघी, दि. 14 (शफिक शेख) :- आर्मी पब्लिक स्कूल दिघी मध्ये दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारी 2023 रोजी विद्यालयाचा वार्षिक समारोह विद्यालयाच्या प्रांगणात हर्श व उल्लासात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर डी जी पटवर्धन, कमान्डेंट, बाम्बे इंजीनियर ग्रुप एंड सेंटर व अध्यक्ष आर्मी पलिक स्कूल, दिघी उपस्थित होते. तसेच माननीय पाहुण्या म्हणून श्रीमती अर्चना पटवर्धन, अध्यक्ष परिवार कल्याण संगठन बी ई जी एंड सेंटर, उपस्थीत होत्या. श्री शाइन मैकफर्सन, प्रिंसिपल, द बिशप्स को एड स्कूल, कल्याणी नगर व कर्नल अनुपम माथुर आणि श्रीमती माथुर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पुण्यातील प्रतिष्ठित विद्यालयांच्या प्राचार्यांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या यस्मिन कौर यांच्या स्वागत भाषणाने झाली. ‘ट्राउवेल, डिस्कवर दी ट्रेजर ऑफ़ लिटरेरी हिस्ट्री’ या विषयावर आधारित या कार्यक्रमत 2000 ईसा पूर्व ते 2023 ई. पर्यंत मेसोपोटामिया, मिस्त्र, भारत आणि रोमची गौरवशाली सभ्यता दर्शवणारा रंगारंग कार्यक्रम प्रस्तूत कारण्यात आला. या नाट्यरुपी कार्यक्रमामध्ये मंगळवासी पृथ्वीवर येऊन मानवानी लावलेल्या वेगवेगळ्या शोधांबद्दल जाणुन घेतात व मानवाच्या निरंतर प्रयत्नांनी तो कसा प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे हे दृष्टिक्षेपात आणून देतात. कार्यक्रमा दरम्यान प्रस्तुत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक नृत्य व लयबध्द गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सांगता प्राचार्या सौ. कौर यांच्या आभारप्रदर्शन व राष्ट्रगीताने झाली. उपस्तीत पालकांनी, अधिकारी यांनी कार्यक्रमाबद्दल स्कूल, विद्यार्थी, स्टाफ, प्राचार्या यांना धन्यवाद दिले.