आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ अखेर सद्गुरु सरुताई माऊली पुण्यतिथी सोहळा – १रोजी रथोत्सव.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी:-२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ अखेर सद्गुरु सरुताई माऊली पुण्यतिथी सोहळा – १रोजी रथोत्सव.

मायणी प्रतिनिधी- सद्गुरु सरुताई माऊली) मायणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही संत सद्गुरु सरुताई माऊली यांचा १४ वा संजीवन समाधी सोहळा २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रविंद्र बाबर यांनी दिली. २७ ते ३०सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री सरुताई लीलामृत ग्रंथाचे पारायण होणार आहे.या कालावधीत पारायणाबरोबरच दररोज सकाळी९वाजता आरती,त्यानंतर गणेश पूजन,ग्रंथ पूजन,१२ वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे.याशिवाय दररोज १ते३यावेळेत महिला भजन साधना,३ते५सांस्कृतिक कार्यक्रम,५:३० ते ६:३० हरिपाठ,रात्री ७ ते ९ किर्तन,९ ते १० भोजन,११ ते पहाटे ४ जागर,पहाटे ४ ते ६ काकडा असे कार्यक्रम होणार आहेत.भाविक भक्तांनी आपली नावे नोंद करुन पारायणाचा आनंद घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यात नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.२८ सप्टेंबरला प्रा.वसंत हंकारे यांचे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाज प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४: ३२ ला सद्गुरु सरुताई माऊली यांच्या समाधीवर फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल.त्याचदिवशी सकाळी ११ वाजता ना.जयकुमार गोरे,सौ.सोनियाताई गोरे,माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर,डॉ.सौ.उर्मिलाताई येळगावकर,आमदार धैर्यशील कदम,सौ. सुनिताताई कदम यांच्या शुभहस्ते पालखी व रथ सोहळा शुभारंभ होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button