क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भारती विद्यापीठ:-(पुणे)-खुनाच्या गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रेम जगताप यास शिताफीने अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भारती विद्यापीठ:-(पुणे)-खुनाच्या गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रेम जगताप यास शिताफीने अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी.

दिनांक ०४/०५/२०२६ रोजी रात्रौ ०९.१५ वा चे सुमारास निलगीरी चौकं आंबेगाव पठार, पुणे येथे विधीसंघर्षीत बालक़ याने फिर्यादी यांचा मुलगा नयन सचिन जाधव, वय १८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ०४ चौथा मजला, शिवकृपा अपार्टमेंन्ट, साई-सिध्दी चौक, आंबेगाव पठार पुणे याचे सोबत दोन दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन, त्याचे साथीदारांचे मदतीने नयन याचे डोक्यावर लोखंडी धारधार हत्याराने वार करुन, तसेच सिर्मेन्टचे ब्लॉक त्याच्या डोक्यामध्ये मारुन, त्यास जिवे ठार मारले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रेम महेश जगताप, वय २२ वर्षे, रा. तुकाई दर्शन, वडगाव, पुणे याचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक सदर्शन गायकवाड यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे तपास पथकाचे अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर हे शोध घेत असताना, नमुद आरोपी हा तुकाईनगर, हिगणे, वडगाव, पुणे येथे थांबला असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे प्रेम महेश जगताप याचा वडगाव, तुकाईनगर, हिगणे रोड, पुणे येथे जावुन त्यांचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयांत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अण्णा दराडे, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.
(सुदर्शन गायकवाड) वरीष्ठ पोलीस निरीक्षक
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर




