राहता:-प्रहार जनशक्ती पक्षाची महावितरण उप-कार्यकारी अभियंता श्री.पाटिल साहेब यांच्या दालनात तब्बल दिड ते दोन तास बैठक.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मा. राज्यमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर ; राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची महावितरण उप-कार्यकारी अभियंता श्री. पाटिल साहेब यांच्या दालनात तब्बल दिड ते दोन तास बैठक.
कृषी पंपासाठी सुरू असलेला अनियमित विद्युत पुरवठा , सक्तीची वीजबिल वसुली , महावितरणचे शेतीचे रोहित्र खंडित करण्याचे सुरू असलेले अन्यायकारक धोरण अशा विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा. बैठकीत काही अंशतः तर काही पूर्णता मागण्या मान्य..!
_पुढील सात दिवसांत तालुक्यातील सर्व गावांत कृषी पंपासाठी पूर्ण दाबाने आठ तास नियमितपणे वीजपुरवठा सुरू होणार तसेच पंधरा दिवसांत गावठाण भागात नियमित सिंगल फ्यूस वीजपुरवठा सुरू करणार असल्याची उप कार्यकारी अभियंता श्री पाटील सरांची ग्वाही.
रोहित्र खंडित करण्या’अगोदर दोन दिवस आधी शेतकऱ्यांना नोटीस मिळणार ,शेतकऱ्यांच्या समनवय बैठकी’शिवाय विद्युत रोहित्र खंडित होणार नाही. या संबंधित
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना निर्गमित करून , काय कार्यवाही केली याचा प्रहारकडे लेखी पाठपुरावा करणार असल्याची श्री .पाटील यांची भूमिका.
उपस्थित पदाधिकारी-
श्री. दिनेशराजे शेळके पाटिल (तालुकाध्यक्ष-प्रहार जनशक्ती पक्ष राहाता) , श्री. बबनराव डांगे पाटील (तालुकाध्यक्ष-प्रहार शेतकरी संघटना राहाता) ,श्री. जगन्नाथ सरोदे पाटील (समनव् यक -प्रहार जनशक्ती पक्ष राहाता) श्री वसंतराव काळे पाटिल (तालुका संघटक -प्रहार जनशक्ती पक्ष राहाता) श्री. विक्रम दाभाडे- (कार्याध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष नांदुखी बु शाखा ) श्री .विशाल दाभाडे (शाखाध्यक्ष -प्रहार दिव्यांग क्रांती नांदूखी खु)श्रीमती लताताई दाभाडे(प्रहार सेविका).