रत्नागिरी/राजापूर:-पत्रकार शशिकांत वारीशे हत्येप्रकरणी आरोपीचे लाड थांबवा- इचलकरंजी नागरिक मंच.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दिनांक:-०८/०२/२०२२ हत्या प्रकरण.
पत्रकार शशिकांत वारीशे हत्येप्रकरणी आरोपीचे लाड थांबवा- इचलकरंजी नागरिक मंच.
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येतील आरोपीचे लाड थांबवा व त्यास कठोर शासन व्हावे यासाठी आमच्या भावना प्रशासनास कळवा अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांना करण्यात आली.
सभ्य व सुसंस्कृत महाराष्ट्रात परखड भूमिका घेऊन पत्रकारिता करताना पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत आहेत पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे नोंद करायला टाळाटाळ केली जाते.याबाबत डिवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचसह खालच्या पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण व सक्त सूचना देणे गरजेचे आहे.त्याअभावी महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकाराना कठीण झाले आहे.या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे महानगर टाईमचे राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या वाहनाने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार या गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली जाते मात्र हा अपघात नसून खून घातपात आहे हे उघड झाले आहे नव्याने खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते करचालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या चारचाकी खाली वार्षिक यांचा मृत्यू होतो हा योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे त्यामुळे त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा खाली गुन्हा नोंद करून जलद गती न्यायालय मार्फत सुनावणी व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी असाही निवेदनात उल्लेख आहे.पत्रकारांचा आवाज विविध पद्धतीने बंद करण्याचा होत असल्याने प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही वारंवार पत्रकार होणारी हल्ले त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत उग्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. त्याचप्रमाणे पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे या गोष्टीचा उल्लेख करत त्यांचे होणारे लाड थांबवावेत तसेच आरोपीस कडक शासन होऊन पत्रकारांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी शासनाने प्रयत्नशील राहावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना इचलकरंजी नागरिक मंचचे धैर्यशील कदम,विद्यासागर चराटे, सुहास पाटील,शितल मगदूम,दीपक पंडित,अँड पवन उपाध्ये,अँड कुमार पाटील,राजु कोन्नुर,अमित बियाणी, अमोल मोरे,महेंद्र जाधव,उमेश पाटील,मीना कासार,कल्पना माळी, सुप्रिया माने,ध्रुवती दळवाई,रुपाली माळी,नितीन ठिगळे,राजेश बांगड, प्रज्योत चौगुले,श्रीनिवास डाळ्या,राम आडकी,दीपक अग्रवाल,हरीश देवाडिगा,अभिजीत पटवा उपस्थित होते