फलटण:-पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण : मराठी पत्रकार परिषदेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण :
मराठी पत्रकार परिषदेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.
फलटण :
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास युद्ध पातळीवर व्हावा, अशा मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका शाखेने येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले आहे.
सकाळी ११ वाजता येथील अधिकार गृहात असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावून पत्रकारांनी हे निवेदन दिले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, यशवंत खलाटे, लखन नाळे ,विकास शिंदे , वैभव गावडे, राजकुमार गोफणे, प्रशांत रणवरे, किसन भोसले, युवराज पवार, विक्रम चोरमले, शक्ती भोसले, अनमोल जगताप, काकासाहेब खराडे, विजय भिसे, अभिषेक सरगर, योगेश गंगतीरे, संजय गायकवाड यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.