खटाव:-मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ पिकांचा सत्यानाश.
प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
मायणी परिसरात डुकरांचा धुमाकूळ पिकांचा सत्यानाश.
मायणी प्रतिनिधी_मायणी परिसरात सध्या डुकराने धुमाकूळ घातला असून रब्बी हंगामातील गहू हरभरा मका ज्वारी या पिकांचा सत्यानाश सुरू झाला असून या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी गोरख घाडगे यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की वडार समाजातील लोकांनी डुकरांचे कळप पाळलेले आहेत या या डुकरांना सकाळी सोडून दिली जाते ती डुकरे मायणी परिसरातील विशेषता श्रीखंडे वस्ती बागडे वस्ती या वस्तीवरील असणाऱ्या शेतात धुडगूस घालतात त्यामुळे पिकांचा सत्यानाश होतो याबाबत येथील शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला अनेक वेळा तक्रारी देऊनही काही उपयोग झाला नाही तरी पोलीस प्रमुख समीर शेख यांना लेखी निवेदन देणार असल्याची माहिती गोरख घाडगे यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.