गंगापुर :सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात प्रहार संघटनेचे सलग दुसऱ्या दिवशी ही अन्नत्याग आंदोलन चालु
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापुरःसार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात प्रहारच अन्नत्याग आंदोलन चालू.
शंकरपूर फाटा-सिरेसायगाव ते वजनापूर शिवारापर्यन्त ची रस्ता दूरूस्ती सह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या विरोधात तक्रारदार प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुकासचिव शिवाजी गायकवाड यांनी चालू केलल अन्नत्याग आंदोलन दुसर्या दिवशीही चालू आहे.प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करत अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू आहे.
प्रमुख मागणी असलेला शंकरपूर फाटा-सिरेसायगाव ते वजनापूर शिवारापर्यन्त च्या रस्तासाठी शासन स्तरावर कुठलाही प्रकारचा निधी उपलब्ध नाही.पुन्हा मार्च 2023 च्या अर्थसंकल्पात मंजुरीसाठी सादर करू.राज्यमार्ग-216 महेबुबखेडा ते शंकरपूर दोन महिन्यापूर्वी चालू झालेला आता पुन्हा रस्ता उखडून ठेवून जनतेची अडचण वाढवणारा आहे.जेसीबीच्या सहाय्याने उखडून ठेवलेल्या रस्त्यामुळे पुर्वीचे दगड गोटे वाहन धारकाला अपघातास निमञण देत आहे.जसे की महेबुबखेडा शंकरपूर चालू असलेल रस्ता दूरूस्ती काम अंदाजपत्रकानुसार त्वरीत पुर्ण करण्याची मागणी आहे.या मागणीवर ठोस अस आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत नाही. पळवाट शोधण्याच काम करत आहे.राज्यमार्ग 216 निकृष्ट रस्ता दुरूस्ती प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चोर-पोलीस खेळताना दिसत आहे.यापूर्वी आंदोलना दरम्यान दिलेल्या पञानुसार कोणतीही कारवाई झालेली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सातत्याने आपली भुमिका बदलत आहे.या सर्व प्रकरणातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शंका निर्माण होत आहे.
वरिष्ठ अधिकारी कर्तव्यात कसूर करत आहे
ठेकेदाराने खराब झालेल काम पुन्हा करून द्याव नसता ठेकेदारवर निविदेतील शर्ती व अटी नुसार कार्यवाही केली जाईल अस सहा महीन्यापूर्वी लेखी आश्वासन दिल होत. त्यानंतर ठेकेदारानेही काम केल नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यानूसार कार्यवाही केली नाही.कार्यकारी अभियंता केन्दे साहेब व उपविभागीय अभियंता विरवडेकर सर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे.