अहिल्यानगर:-विळद ग्रामपंचायतीच्या कामांना गती; आमदार काशिनाथ दाते साहेबांची भेट.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अहिल्यानगर:-विळद ग्रामपंचायतीच्या कामांना गती; आमदार काशिनाथ दाते साहेबांची भेट.

अहिल्यानगर तालुक्यातील
विळद येथे विविध विकासकामांना चालना देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावचे सरपंच संजयजी बाचकर यांनी मा. आमदार काशिनाथ दाते साहेब यांची भेट घेतली. हॉटेल जय माता दि येथे झालेल्या या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
रेल्वे पुलापासून ते पवार वस्तीपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये (₹ १० लाख) मंजूर करण्यात आले आहेत. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पाण्याची टाकी येथील लाईट आणि नवीन ट्रान्सफॉर्मर संदर्भातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले.
तांबे वस्तीकडील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी:
यावेळी सरपंच संजयजी बाचकर यांनी आमदार साहेबांचे आभार मानले. आमदार साहेबांच्या सहकार्यामुळे विळद गावातील विकासकामांना मोठी चालना मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



