ताज्या घडामोडी

वाई:-(भुईंज)-भरघोस उत्पन्नासाठी पेरणी करतानाच घ्या काळजी:कृषी अधिकारी श्री रायकर

पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

 पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

पेरणी करताना घ्यायची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती.
1) शेताचा उतार पाहून उताराला आडवी पेरणी करावी(चिबड रान असेल तर उताराच्या दिशेने)
2) पेरणी यंत्राचे फण योग्य अंतरावर जोडणी केले आहेत का पाहावे व सपाट जमिनीवर पेरणीयंत्र ठेवून सर्व फण, फाळ एका रेषेत आहेत का व यंत्र दोन्ही बाजूने समान लागत आहे का पाहावे. एक बाजू खाली एक वर असे होऊ नये.
3) बीबीएफ पेरणी यंत्राने पेरणी करताना शेवटच्या फणावर सरीची माती पडत नाही ना याची काळजी घ्यावी, त्यानुसार फाळ इकडे तिकडे सरकवावे किंवा कमी जास्त करावे
4) बीबीएफ मध्ये सरी काढत असताना ती पुन्हा मागे पास ने बुजणार नाही याची काळजी घ्यावी.
5) चालक नव्याने पेरणी करणारा असेल तर बीबीएफ ची सरी काढण्यावर लक्ष देऊन पेरणी जास्त किंवा कमी खोलीवर तर होत नाही ना याची काळजी घ्यावी.
6) 75-100 मिमी पाऊस झाल्यावर, चांगला वाफसा असतानाच पेरणी करावी व पेरणीची खोली योग्य राखावी
7) पेरणीसाठी चकत्या/प्लेट त्याच पिकाच्या जोडल्या आहेत का आणि योग्य प्रकारे बी पडत आहे का हे पाहावे
8) मातीत रासायनिक खत खाली आणि बियाणे वरती अशाप्रकारे पेरणी होत आहे का पहावे त्यानुसार त्या नळ्या जोडणी करावी
9) पास,सरी,वेसण बसल्याने मातीचा लोळ पेरणीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी वेळोवेळी पास ची घाण काढणे,बेरा भरला आहे का पाहणे गरजेचे आहे
10) ट्रॅक्टरने पेरणी करताना दुसऱ्या गिअरवर,वेग 5 किमी/प्रती तास याप्रमाणे योग्य ठेवावी.ट्रॅक्टरचा वेग जास्त ठेवणे,रात्री पेरणी करणे,वाफसा नसताना पेरणी करणे या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात.यंत्राचे मातीवरील चाक,चैन योग्य प्रकारे फिरत आहे का हे वेळोवेळी पाहावे.
11) चांगला वाफसा असतानाच पेरणी करावी.
12) दोन फेऱ्या झाल्या की बी,रासायनिक खत सर्व कप्प्यातून सारख्या प्रमाणात पडत असल्याची खात्री करावी.
13) शेतकरी बंधूनी पेरणीवेळी लक्ष ठेवून पेरणी करून घ्यावी जेणेकरून पुढे दाट, पातळ, खोल, उथळ पडले किंवा उगवणक्षमता बाबत समस्या येणार नाही.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button