पुणे:-समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे गेली तीन वर्षे जी स्वधार योजना मिळालेली नाही या गंभीर मुद्द्याला घेऊन मागासवर्गीय विद्यार्थी उपोषणास.
प्रतिनीधी:-आशुतोष चव्हाण:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
समाजकल्याण आयुक्त कार्यालय पुणे येते गेल्या पाच दिवसांपासुन मागासवर्गीय विद्यार्थी गेली तीन वर्षे जी स्वधार योजना मिळालेली नाही या गंभीर मुद्द्याला घेऊन उपोषणास बसले आहेत.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे परंतु आजही शिक्षणाकरिता शिक्षण क्षेत्रातील आपल्या हक्काच्या मागण्यांकरिता विद्यार्थ्यांना उपोषण करावे लागत असेल तर आम्हाला ते शब्द आठवतात तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे भीमा तुझ्या विचारांची माणसे मिलीत कारे भिमा…..
हक्क अधिकार संविधान हे येणाऱ्या पिढीला समजून सांगणे फार गरजेचे आहे कारण आजकालचा प्रचार आणि प्रसार पाहता एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो की संघर्ष अटल आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागेल आय विल सी यु कोर्ट म्हणत असताना आता त्या वकिलांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. की खरोखर ते वकील तुम्हाला तुमच्या प्रकरणाला तुमच्या भावनांना समजावून घेत आहेत की नाही हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे हा लेख नाही हे वाक्य नाही हा अनुभव आहे आम्ही गरीबी फार जवळून पाहिली आहे गरिबीचे चटके आणि संघर्षाचे आणि स्वाभिमानाचे फटके सर्वकाही सांगून जातात कारण संघर्षाच बीज हे चळवळीच्या गर्भात जन्माला येतं…..
अनमोल कांबळे