शिक्रापूर:-खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी एक कोटीचा दावा दाखल करणार : बबन ढोकले.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी
एक कोटीचा दावा दाखल करणार : बबन ढोकले
शिक्रापूर, दि. 17 (शफिक शेख):- जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याबाबतचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी करंदी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबन ढोकळे यांनी खोटी तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एक कोटी रुपयाची अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमचे प्रतिनीधीला कळविले आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ढोकले यांच्याविरुद्ध ज्ञानदेव तनपुरे या व्यक्तीने जमीन विक्रीत ठरलेली रक्कम दिली नाही म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. यासंदर्भामध्ये ढोकले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तनपुरे यांनी दाखल केलेला गुन्हा पूर्णतः खोटा असून, तनपुरे यांनी पोलिसांकडे संपूर्ण कागदपत्रे सादर न करता, तसेच खरी माहिती न देता, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा दुरुपयोग करून माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, असे ढोकले यांनी सांगितले.
“वास्तविक पाहता तनपुरे यांच्याकडून 2020 साली सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मी त्यांचे कडून 15 गुंठे जागा विकत घेतलेली आहे. ही जागा विकत घेत असताना त्यांना मी ठरलेली रक्कम दिली असून, सदर जागा ही माझ्या एकट्याच्या नावावर असून, त्याला अन्य कोणी वाली नाही, असे बनावट दस्त तयार करून तसे लेखी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन माझी फसवणूक तनपुरे यांनी केली आहे. कारण मी व्यवहार केल्यानंतर काही दिवसातच ज्ञानदेव तनपुरे यांचे बंधू यांनी मला सदर जागे त्यांचा हिस्सा असून ते देखील त्या जागेत मालक आहेत अशा प्रकारची नोटीस पाठवली होती. याबाबत मी ज्ञानदेव तनपुरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मला उडवा उडवीची उत्तरे दिली, त्यानंतर मी माझे वकिलामार्फत त्यांना कायदेशीर नोटीस दिली होती. सदर नोटीस न स्वीकारता त्यांनी माझ्याविरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबतची सर्व वस्तुस्थिती मी पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून देत असून मला कायद्याकडून योग्य न्याय मिळेल असा मला विश्वास आहे.“
याबाबत अधिक माहीती देताना ढोकले म्हणाले की “ माझी फसवणूक केल्याप्रकरणी, तसेच माझ्याच विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझी समाजात बदनामी केल्याबद्दल मी ज्ञानदेव तनपुरे यांच्या विरुद्ध सक्षम कोर्टामध्ये व पोलिसांकडे दाद मागणार असून, यासंदर्भात मी त्यांचे विरुद्ध मेहरबान कोर्टात सुमारे एक कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. अशी माहीती आमचे प्रतिनिधींशी बोलताना दिली.



