पुणे पिंपरी:-पेढे वाटून नगारे वाजवून ‘आप’च्या दिल्ली विजयाचा पिंपरीत जल्लोष.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पेढे वाटून नगारे वाजवून ‘आप’च्या दिल्ली विजयाचा पिंपरीत जल्लोष.
पिंपरी, दि. ७ (शफीक शेख) :- दिल्लीतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने १३४ जागांवर विजय मिळविल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून व पारंपरिक नगारा वादन करून जल्लोष केला.
केंद्रातील भाजप सरकारवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. भाजपच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली आहे, असे प्रतिपादन यावेळी आप च्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.
या वेळी
यल्लाप्पा बालदोर, अजय सिंग, वहाब शेख, मैमुना शेख, बाळू भंडारी, मंगेश आंबेकर, संदीप राठोड, चेतन बेंद्रे, सुरेश भिसे, संतोष बागाव, ज्योती शिंदे, शुभम यादव, मीना जावळे, सीमा यादव, स्मिता पवार, अमर डोंगरे, देवेंद्र सिंग यादव, स्वप्निल जेवळे, डॉक्टर रामेश्वर मुंडे, ब्रह्मानंद जाधव, चांद मुलानी, रशीद अत्तार, वाजिद शेख कार्यकर्ते उपस्थित होते.